• Download App
    केंब्रिजमध्ये भारताची निंदा करून राहुल गांधींची अफाट चीन स्तुती!!; हेमंत विश्वशर्मांची सणसणीत चपराकी उत्तरे|Himanta biswasarma refutes all charges against India made by rahul Gandhi in his cambridge speech

    केंब्रिजमध्ये भारताची निंदा करून राहुल गांधींची अफाट चीन स्तुती!!; हेमंत विश्वशर्मांची सणसणीत चपराकी उत्तरे

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात जी 20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना केंब्रिजमध्ये जाऊन राहुल गांधींनी भारताची निंदा करून चीनवर स्तुतिसुमने उधळली आहेत. मात्र, राहुल गांधींच्या या भारतावरच्या वैचारिक हल्ल्याला आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी सणसणीत चपराक देणारी प्रत्युत्तरे दिली आहेत.Himanta biswasarma refutes all charges against India made by rahul Gandhi in his cambridge speech

    आत्तापर्यंत परकीय एजंट भारताला टार्गेट करत होते पण आता भारतीय नेतेच परदेशात जाऊन भारताला टार्गेट करत असल्याची टीका हेमंत विश्वशर्मा यांनी केली आपल्या ट्विटर हँडल वरून एकापाठोपाठ एक ट्विट करून हेमंत विश्वशर्मा यांनी राहुल गांधी यांच्या प्रत्येक युक्तिवादाचा मुद्देसूद प्रतिवाद केला आहे.



    राहुल गांधी म्हणाले होते, भारतात लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे आपण भारतात राहून मोकळेपणाने बोलू शकत नाही.

    यावर हेमंत विश्व शर्मांनी प्रत्युत्तर दिले, हेच ते राहुल गांधी आहेत, की ज्यांनी 4000 किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढली आणि त्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. यात्रेला संपूर्ण सुरक्षा देण्याचे कर्तव्य मोदी सरकारने उत्तम पार पाडले. पण भाजपनेच जेव्हा अशा देशभर यात्रा काढल्या, तेव्हा काँग्रेसच्या सरकारांनी या यात्रांना कितपत संरक्षण दिले होते??, उलट भाजप नेत्यांच्या यात्रा हाणून पाडण्याचाच प्रयत्न काँग्रेस सरकारांनी केला, असा आरोप हेमंत विश्वशर्मा यांनी केला आहे.

    राहुल गांधीने दावा केला, पेगासस त्यांच्या फोनमध्येच होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना “इशारा” दिल्याचा त्यांचा दावा आहे.

    पण वस्तुस्थिती काय होती?? त्यांनी स्वतःचा फोन तपास संस्थेकडे सोपवायला नकार दिला. संबंधित तपास संस्था सुप्रीम कोर्टाने नेमली होती आणि त्या तपास संस्थेने व्यापक तपास केल्यानंतर पेगासस हेरगिरीचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असा सुप्रीम कोर्टाने निष्कर्ष काढला आहे.

    राहुल गांधींनी आरोप केला, की अल्पसंख्यांक भारतात असुरक्षित आहेत आणि त्यांना दुय्यम नागरिकत्व दिले जाते.

    पण वस्तुस्थिती काय आहे??, 2014 नंतर भारतात जातीय दंगलींचे प्रमाण सर्वात कमी झाले आहे. अल्पसंख्यांक समुदायातील कुटुंबांचे उत्पन्न वाढले आहे. अल्पसंख्यांक समुदायातील अनेक नेत्यांनी मोदी सरकारवर विश्वास दाखवला आहे.

    राहुल गांधींचा दावा आहे, की भारत युनियन ऑफ स्टेट्स आहे. हे युरोपियन मॉडेल आहे.

    पण वस्तुस्थिती काय आहे?? भारत आणि भारतातील महाजनपदे ही हजारो वर्ष जुनी संस्कृती आहे. संपूर्ण युरोप एकच एक पॉलिटिकल एन्टिटी कधीही नव्हता. पण राहुल म्हणतात भारताने युरोपचे मॉडेल उचलले!!, हे खोटे आहे!!

    राहुल गांधींनी भारताची निंदा करून चीनची स्तुती केली आहे. चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह चे उदाहरण दिले आहे.

    पण वस्तुस्थिती ही आहे, की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमुळे अनेक देशांमधली आर्थिक स्थिती वाईट झाली. ते चिनी कर्जाच्या सापळ्यात अडकले. राहुल गांधींचे याबाबत खरंतर अंकल पित्रोदांनी डोळे उघडायला हवे होते.

    हेमंत विश्व शर्मा यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून राहुल गांधींच्या केंब्रिज मधल्या भाषणातील प्रत्येक युक्तिवादाचे अक्षरशः असे वाभाडे काढले आहेत.

    Himanta biswasarma refutes all charges against India made by rahul Gandhi in his cambridge speech

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!