वृत्तसंस्था
नवी दिल्ली : याला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांची शक्कल म्हणायचे की गहाण ठेवलेली राजकीय अक्कल…??, हा प्रश्न आता पडला आहे…!!आधीच काँग्रेस कार्यकर्त्यांचे वाभाडे संपूर्ण देशभर वेगवेगळे नेते नेत्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत काढत असतात.Hi shakkal ki gahanavatitli akkal ??; Youth Congress activists carrying pipes in their hands … but how against …
पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली राजकीय बुद्धी नसत्या ठिकाणी पाजळली आहे. त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकार विरोधात हातात पाईप घेऊन आंदोलन केले आहे.मुंबईत मध्यंतरी त्यांनी बैलगाडीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण ऐन वेळेला त्यांच्यासकट बैलगाडीच कोसळली.
आता नवी दिल्लीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारने जाहीर केलेल्या National Monetization Pipeline या धोरणाविरुद्ध आंदोलन केले. या धोरणातला”पाईपलाईन” हा शब्द उचलून काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात खरोखर पाईप घेऊन हे आंदोलन केले.
वास्तविक पाहता केंद्रातल्या “नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन” या धोरणाशी कोणत्याही पाईपलाईनचा काहीही संबंध नाही. इथे पाईपलाईन याचा अर्थ टप्प्याटप्प्याने करण्यात येणारी योजना किंवा राबविण्यात येणारे धोरण असा आहे.
प्रत्यक्षातल्या कोणत्याही पाईपचा काहीही संबंध नाही. परंतु युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा अर्थ समजला नाही. म्हणून त्यांनी “नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन” यातला पाईपलाईन शब्द उचलले आणि हा कुठल्यातरी पाइपलाईनशी संबंधित निर्णय असल्याचा समज करून घेऊन हातात चक्क पाईप घेतले आणि आंदोलन केले.
अनेकदा राजकीय शक्कल लढवून आंदोलन करण्यात येते. कधीकधी ही राजकीय शक्कल संबंधित पक्षाच्या उपयोगी देखील ठरते. पण या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेमके काय म्हणावे…?? ज्यांची राजकीय समजच इतकी तोकडी आहे, की “नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन” हे सरकारचे धोरण आहे. कोणत्याही पाइपलाईनशी काहीही त्याचा संबंध नाही… हे या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगणार कोण…??, हा प्रश्न आहे.
मुंबईत काँग्रेसचे कार्यकर्ते बैलगाडीवर चढून कोसळले. दिल्लीतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात पाईप घेतले… आणि या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बळावर देशात काँग्रेसचे बडे – बडे नेते सत्तेवर येण्याची मनसुबे रचत आहेत…!!
Hi shakkal ki gahanavatitli akkal ??; Youth Congress activists carrying pipes in their hands … but how against …
महत्त्वाच्या बातम्या
- E-Shram Portal : आज मोदी सरकार 38 कोटी लोकांना भेट देणार, योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचेल
- अफगाणिस्तान : टोलो न्यूजच्या पत्रकाराच्या हत्येची बातमी, पत्रकाराकडून ट्विटर हँडलवर जिवंत असल्याचा खुलासा
- वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन, आंदोलनात आले केवळ आठ जण
- सावधान, डेल्टा प्लसचा २४ जिल्ह्यांत प्रादुर्भाव; सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव जिल्ह्यात