विशेष प्रतिनिधी
नाशिक : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची वायफळ बडबड सध्या सगळ्या राज्याचे मनोरंजन करत आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी कॉँग्रेसने मालेगावमध्ये कॉँग्रेसचा केसाने गळा कापला आहे Here Nana Patole’s babbling and here NCP cut the throat of Congress
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मालेगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण माजी आमदार रशीद शेख यांच्यासह महापौर ताहेरा शेख आणि २७ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या गुरुवारी हे सर्वजण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
मालेगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच बालेकिल्ल्याला आता मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच सुरुंग लावला आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारासह तब्बल २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला खिंडार पडलं आहे.
यापूर्वी माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता. आता त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख तसेच आई महापौर ताहेरा शेख हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. शेख कुटुंबीय हे काँग्रेसचे निष्ठावंत कुटुंब मानले जात होते. मात्र या कुटुंबाला आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे.
Here Nana Patole’s babbling and here NCP cut the throat of Congress
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदके, इथे वाचा संपूर्ण यादी
- MUMBAI : मंत्रालयाच्या मुख्य गेटवर SRPF जवनाने स्वतःवर झाडली गोळी , उपचारादरम्यान मृत्यू
- मोठी बातमी : जालन्यातील शेतकऱ्यांचा अजित पवार, शिवसेनेच्या खोतकरांवर गंभीर आरोप, साखर कारखान्यातून अन्नदात्याची घोर फसवणूक
- Budget 2022 : खप वाढवण्यासाठी सरकारने नोकरदार-गरिबांना मदत करावी, कोरोना काळात फटका बसलेल्या रिटेल क्षेत्राची अर्थमंत्र्यांकडे मागणी