• Download App
    बिहारमध्ये दारू अड्डे शोधण्यासाठी आता हेलिकॉप्टरचा वापर|Helicopters are now used to search for liquor dens in Bihar

    बिहारमध्ये दारू अड्डे शोधण्यासाठी आता हेलिकॉप्टरचा वापर

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा: बिहारमध्ये दारुबंदी आहे, पण यातही अनेक ठिकाणी दारुचे अवैध अड्डे सुरू आहेत. हे अवैध अड्डे शोधण्यासाठी राज्य सरकारने ब्रिटन-अमेरिकेच्या धर्तीवर हेलिकॉप्टरचा वापर सुरू केला आहे.Helicopters are now used to search for liquor dens in Bihar

    बिहार पोलिसांनी फ्लाइंग स्क्वॉड आणि ड्रोनद्वारे अवैध दारू अड्डे शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारने पहिल्याच दिवशी हेलिकॉप्टरद्वारे केलेल्या कारवाईत मंगळवारी पहिल्याच दिवशी अवैध दारू व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.



    दारुबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरने पाटणा ते गंगेच्या काठावरील भागाचे हवाई सर्वेक्षण केले आणि 5 अवैध दारुचे अड्डे शोधले. अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकाºयांना कळवले आहे. आता हे अधिकारी पुढील कारवाई करतील. त्याचा व्हिडिओही विभागाने जारी केला आहे.

    आॅपरेशन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण बिहारमध्ये अवैध दारुची दुकाने शोधली जाणार आहेत. तसेच, त्या त्या-त्या भागातील पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना सांगून ते अड्डे उद्ध्वस्त केली जातील. दारुबंदी विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार बक्सर ते कटिहार आणि गंगा नदीपर्यंत 11 भागात सतत सर्वेक्षण केले जाणार आहे.

    हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 5 लोक बसू शकतात. हे हेलिकॉप्टर दररोज 6 ते 7 तास सतत ऑपरेशन करू शकते. विमानाच्या प्रत्येक तासाला 75 हजार ते एक लाख रुपये खर्च येईल. हवाई सर्वेक्षणादरम्यान, उत्पादन विभागाच्या अधिका-यांसह अभियंते आणि सपोर्ट डिटेक्शन तज्ञ देखील उपस्थित राहणार आहेत. सपोर्ट डिटेक्शन तज्ञ क्षेत्र ओळखतील आणि ठिकाण चिन्हांकित करतील.

    दारुबंदीनंतरही बिहारमध्ये सतत बनावट दारू पिऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बेतियातील नौतन ब्लॉकच्या दक्षिण तेल्हुआ गावात बनावट दारूमुळे 16 लोकांचा मृत्यू झाला होता.

    तर, गोपालगंजमध्येही बनावट दारू प्यायल्याने 18 जण दगावले. याशिवाय, डिसेंबरमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. 2022 मध्येही विषारी दारुचा कहर सुरूच आहे. जानेवारीच्या पहिल्याच दिवशी नालंदामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता.

    Helicopters are now used to search for liquor dens in Bihar

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!