• Download App
    फक्त 11 लाखांसाठी त्रास दिला जातोय : संजय राऊतांच्या अटकेवर खासदार जया बच्चन यांची प्रतिक्रिया|Harassment for only 11 lakhs MP Jaya Bachchan's reaction to Sanjay Raut's arrest

    फक्त 11 लाखांसाठी त्रास दिला जातोय : संजय राऊतांच्या अटकेवर खासदार जया बच्चन यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर सोमवारी ही सुनावणी पार पडली. दरम्यान, राऊत यांना अटक करण्यात आल्यानंतर विविध स्तरावरुन तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राऊतांना अटक झाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी बोलताना जया बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर आरोप केले.Harassment for only 11 lakhs MP Jaya Bachchan’s reaction to Sanjay Raut’s arrest

    ‘संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यात ईडीचा गैरवापर झाला, असे तुम्हाला वाटते का?’ असा प्रश्न जय बच्चन यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “हो नक्कीच संजय राऊतांना आमचा पूर्ण पाठिंबा असून त्यांना विनाकारण त्रास दिला जातोय. सध्या ईडीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फक्त 11 लाख रुपयांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात.



    2024 पर्यंत असेच चालणार

    संजय राऊतांच्या आईबद्दल जया बच्चन यांना विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या की, राऊत यांची आई खूप म्हातारी आहे. ईडीचा हा अशाप्रकारे सुरू असलेला अवाजवी वापर आणखी किती दिवस चालेल असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न पत्रकारांने बच्चन यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, 2024 पर्यंत देशात हे असेच चालणार आहे.

    राऊतांना ईडी कोठडी

    पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. रविवारी त्यांची सकाळपासूनच चौकशी सुरू होती. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. सोमवारी त्यांना न्यायालयात सादर केले असता, त्यांना चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. राऊतांच्या वकिलाने त्यांना न्यायालीन कोठडी मिळाली अशी मागणी केली होती. तर संजय राऊत पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप ईडीने केला आहे, त्यामुळे ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी आठ दिवसांचा कालावधी मागितला होता. मात्र, न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे.

    Harassment for only 11 lakhs MP Jaya Bachchan’s reaction to Sanjay Raut’s arrest

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी