वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गुजरात हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा सदस्य संजय सिंह यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला अंतरिम स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली. कोर्टाने दोघांनाही 11 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.Gujarat High Court rejects Kejriwal’s plea in PM title case; Order to appear in court
केजरीवाल आणि संजय सिंह यांच्या वतीने न्यायालयात हजर झालेले ज्येष्ठ वकील मिहिर जोशी यांनी अनेक युक्तिवाद करून दोघांना दिलासा देण्याची मागणी केली होती.
त्यावर उत्तर देताना न्यायमूर्ती समीर दवे यांनी कडक टिप्पणी केली आणि म्हणाले – गेल्या सुनावणीदरम्यान दिल्लीत पूर आला होता. त्यानंतर दोघांनाही वेळ देण्यात आला. आता दिल्लीत सर्व काही ठीक आहे, मग कोर्टात हजर व्हायला काय हरकत आहे.
दिल्लीतील पुरामुळे न्यायालयाने दिला वेळ
15 जुलै रोजी प्रथमच याप्रकरणी अहमदाबादच्या मेट्रोपॉलिटन कोर्टाने या नेत्यांना समन्स बजावले होते. दोन्ही नेते गेल्या महिन्यात 13 जुलै रोजी अहमदाबाद न्यायालयात हजर होणार होते, मात्र दिल्लीतील पूरस्थितीमुळे त्यांना आणखी वेळ देण्यात आला होता.
यानंतर कोर्टाने कोर्टात हजर राहण्यासाठी 26 जुलै ही तारीख निश्चित केली होती, मात्र दोघांनी हायकोर्टात धाव घेतली. आज याप्रकरणी सुनावणी झाली.
गुजरात विद्यापीठात तक्रार दाखल
विशेष म्हणजे अहमदाबादस्थित गुजरात विद्यापीठाने दोन्ही नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. पीएम मोदींच्या पदवीशी संबंधित या प्रकरणात केजरीवाल आणि संजय सिंह यांच्यावर विद्यापीठाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप आहे.
संस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह : विद्यापीठ
गुजरात विद्यापीठाने दाखल केलेल्या याचिकेत केजरीवाल आणि संजय सिंह सातत्याने संस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे म्हटले आहे. त्यांना माहिती आहे की, पंतप्रधानांची पदवी आधीच वेबसाइटवर अपलोड केली गेली आहे. असे असतानाही विद्यापीठ पदवी न दाखवून सत्य लपवत असल्याचे दोन्ही नेते सांगत आहेत, तर तसे काहीही नाही.
Gujarat High Court rejects Kejriwal’s plea in PM title case; Order to appear in court
महत्वाच्या बातम्या
- ‘हर घर तिरंगा’ अभियानावर पंतप्रधान मोदींचे ट्विट, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीयांना विशेष आवाहन, म्हणाले…
- राजद्रोहाचा कायदा रद्द होणार म्हणून देशद्रोह्यांना मोकळीक बिलकुल नाही!!; कसे ते वाचा!!
- Niger Crisis: नायजरमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अॅडव्हायजरी जारी, लवकरच भारतात परतण्याचा सल्ला
- ‘तुकडे-तुकडे गँगचे समर्थकच भारत मातेच्या हत्येबद्दल बोलू शकतात’, अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!