• Download App
    Niger Crisis: नायजरमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी, लवकरच भारतात परतण्याचा सल्ला Niger Crisis Advisory issued for Indians living in Niger advised to return to India soon

    Niger Crisis: नायजरमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी, लवकरच भारतात परतण्याचा सल्ला

    लष्करी बंडानंतर निदर्शने आणि हिंसाचारात वाढ झाली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर नायजर सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नियामे येथील भारतीय दूतावासात नोंदणीकृत नसलेल्यांनी हे काम त्वरित करावे, असेही सांगितले. सध्या नायजरमध्ये 250 भारतीय राहतात. लष्करी बंडानंतर निदर्शने आणि हिंसाचारात वाढ झाली आहे. Niger Crisis Advisory issued for Indians living in Niger advised to return to India soon

    परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, नायजरमध्ये जाण्याची योजना आखणाऱ्यांनी तेथील परिस्थिती सुधारेपर्यंत जाणे टाळावे. त्यांनी त्यांच्या प्रवासाचा पुन्हा विचार करायला हवा. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारत नायजरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

    नायजरमध्ये २६ मे रोजी सत्तापालट झाला होता. सत्तापालटानंतर लष्कराने राष्ट्राध्यक्षांना हटवून सत्ता काबीज केली. यानंतर अध्यक्षांना ताब्यात घेण्यात आले. अमेरिका, युरोपसह संयुक्त राष्ट्रांनी यावर चिंता व्यक्त केली होती.

    Niger Crisis Advisory issued for Indians living in Niger advised to return to India soon

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही