विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळवल्यानंतर त्यांना छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. परंतु, मुख्यमंत्री नेमका कोण होणार?, असा “राजकीय पेचप्रसंग” प्रसार माध्यमांनी तयार केला आहे.Goa Chief Minister: Vishwajit Rane meets Governor; Dr. Pramod Sawant meets Prime Minister Modi … !!, who will be the Chief Minister ??, who else has a question
मध्यंतरी भाजपचे आमदार विश्वजित राणे यांनी राज्यपाल श्रीधरन पिल्ले यांची भेट घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विश्वजित राणे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढे मोठे आव्हान उभे करणार अशी चर्चा देखील रंगली होती. त्यामध्ये त्यांना काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेल्या आणि विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदारांची साथ मिळणार, असा दावाही करण्यात येत होता.
परंतु, विश्वजित राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली, तर डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत गोव्याचे प्रभारी सी. टी. रवी हे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवर डॉ. प्रमोद सावंत यांच्या भेटीचे ट्विट केले आहे. त्यामुळे अर्थातच गोव्यातला नेतृत्वाचा प्रसार माध्यमांनी उभा केलेला “पेचप्रसंग” मिटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विश्वजीत राणे हे जरी राज्यपालांना भेटले असले तरी प्रमोद सावंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले.
मोदींच्या ट्विटर हँडल वरून भेटीचा फोटो
मुख्य म्हणजे पंतप्रधानांनी आपल्या कार्यालयात डॉक्टर प्रमोद सावंत यांना भेट दिली या भेटीचा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. यातून पुरेसा “राजकीय मेसेज” त्यांनी गोव्यातील भाजपच्या आमदारांना आणि गोव्यातल्या जनतेला दिला आहे.
त्यामुळे प्रसार माध्यमांनी जरी भाजपमध्ये भाजपमधून विश्वजित राणे मुख्यमंत्री होणार की डॉ. प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी मिळणार अशी वातावरण निर्मिती केली असली तरी नेमकी कोणाला संधी मिळणार आहे?, आजच्या दिल्लीतल्या घडामोडीतून स्पष्ट होताना दिसत आहे.
Goa Chief Minister: Vishwajit Rane meets Governor; Dr. Pramod Sawant meets Prime Minister Modi … !!, who will be the Chief Minister ??, who else has a question
महत्त्वाच्या बातम्या
- झुलन गोस्वामी अडीचशे विकेट्स पूर्ण करणारी पहिली गोलंदाज
- महाविकास आघाडीचा दट्ट्या : चंद्रशेखर बावनकुळेंची महावितरण कामांप्रकरणी होणार चौकशी!!
- ED Faraz Malik : ईडीचे दुसरे समन्स टाळल्यानंतर फराज मालिकला ईडी तिसरे समन्स पाठविणार!!
- ED – IT Raids : युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवर ईडी – इन्कम टॅक्सचे देशभर छापे, मुंबई, ठाणे, नाशकातल्या ऑफिसेसवरही तपास!!