विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला याप्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणात जे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत त्याबाबतचे अहवाल तयार करण्यास न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि त्यातील तज्ज्ञांशी बोलावे अशी सूचना खंडपीठाने साळवे यांना केली.Give security to Lakhimpur witneses
या प्रकरणामध्ये दोन तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील एक ही पत्रकाराच्या हत्येशी संबंधित आहे. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही ८ नोव्हेंबर रोजी होईल.
याआधी २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या हिंसाचाराच्या तपासामध्ये कोणतीही चालढकल केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पोलिसांना तशा सूचना देखील दिल्या होत्या.
Give security to Lakhimpur witneses
महत्त्वाच्या बातम्या
- लोकल गुरुवारपासून सुसाट धावणार, १०० टक्के फेऱ्या सुरु होणार; प्रवाशांना मोठा दिलासा
- गृहराज्यमंत्री देसाई यांचा पोलिस ठाण्यामध्ये प्रवेश पोलिसांची झाडाझडती, आरोपी शोधण्याचे आदेश
- ‘स्पेशल २६’ लवकरच रिलीज करतोय – नवाब मलिक
- टाटा कंपनीचे १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क; महामार्गावर सुद्धा योजना
- माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यन खानची ड्रग्जची केस मुंबई हायकोर्टात लढणार