विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने मानवतावादी आणि आर्थिक मदत पाठवावी असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी संयुक्तरित्या केले. या दोन देशांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन प्रथमच असे आवाहन केले.Give help to Afghanistan say Pakistan an china
अफगाणिस्तानमध्ये हिवाळा तोंडावर आला असताना जीवनावश्यक वस्तूंचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीविषयी इम्रान आणि जिनपिंग यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. याविषयी पंतप्रधान कार्यालयाने निवेदन जारी केले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सोमवारी तालिबानच्या प्रतिनिधींशी कतारमध्ये उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली. इराणसह शेजारी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह तालिबान सरकार तेहरानमध्ये बैठक घेणार आहे. त्यावेळी चीन आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रीही उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
Give help to Afghanistan say Pakistan an china
महत्त्वाच्या बातम्या
- लोकल गुरुवारपासून सुसाट धावणार, १०० टक्के फेऱ्या सुरु होणार; प्रवाशांना मोठा दिलासा
- गृहराज्यमंत्री देसाई यांचा पोलिस ठाण्यामध्ये प्रवेश पोलिसांची झाडाझडती, आरोपी शोधण्याचे आदेश
- ‘स्पेशल २६’ लवकरच रिलीज करतोय – नवाब मलिक
- टाटा कंपनीचे १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क; महामार्गावर सुद्धा योजना
- माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यन खानची ड्रग्जची केस मुंबई हायकोर्टात लढणार