विशेष प्रतिनिधी
कोची – कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीच्यान दोन डोसमधील ८४ दिवसांचे अंतर हे लशीची उपलब्धता किंवा तिच्या परिणामकारकतेवर आधारित आहे, याचा खुलासा करण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.Give explanation about duration of two doses
किटेक्स गारमेंट्स लिमिटेड या कंपनीने कामगारांना कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस देण्यास परवानगी मिळण्याासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणीदरम्यान न्यायाधीश पी. बी. सुरेश कुमार यांनी दोन डोसमधील अंतर कशाच्या आधारावर निश्चिपत केले आहे, याची माहिती देण्याचे निर्देश केंद्राला दिले.
ते म्हणाले की, जर दोन डोसच्या अंतरासाठी लशीची परिणामकारकता हे कारण असेल तर हे चिंतेचे कारण आहे. कारण मी पहिला डोस घेतल्यानंतर ४ ते ६ आठवड्यात दुसरा डोस घेतला आहे.लशीची उपलब्धता हे अंतरामागील कारण असेल तर ‘किटेक्स’ सारख्या ज्यांना लस विकत घेणे शक्य आहे,
त्यांनी सध्याच्या नियमानुसार ८४ दिवसांची प्रतीक्षा न करता लस घेण्यास परवानगी द्यायला हवी. परिणामकारतेमुळे डोसचे अंतर ८४ दिवस केले असले तर त्यासाठी शास्त्रीय आधार देणे आवश्युक आहे.
Give explanation about duration of two doses
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस, ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून आंदोलनाचा विनायक मेटे यांचा इशारा
- अखेर महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला, रश्मी शुक्ला यांनी बनविलेला अहवाल सीबीआयलो देण्याची तयारी
- विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल, नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५१ लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा
- अनुराधा पौडवाल भाजपाच्या वाटेवर, उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना बांधली राखी