• Download App
    रात्रीस खेळ चाले : मंत्रिमंडळाबाबत अमित शहांबरोबर शिंदे - फडणवीसांची मध्यरात्री खलबतं!!; सरप्राईज एलिमेंट काय??|Game at night: Shinde with Amit Shah about the cabinet - Fadnavis is upset in the middle of the night !!; What is a surprise element?

    रात्रीस खेळ चाले : मंत्रिमंडळाबाबत अमित शहांबरोबर शिंदे – फडणवीसांची मध्यरात्री खलबतं!!; सरप्राईज एलिमेंट काय??

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  मुंबई / गुवाहाटीत दोन आठवड्यांपूर्वी जो रात्रीस खेळ चालू होता त्याची पुनरावृत्ती काल दिल्लीत घडली. महाराष्ट्रातील सत्तांतरा संदर्भात जसे भाजपचे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते मुंबई आणि गुवाहाटी मध्ये रात्री खलबते करायचे तशीच खलबते आज काल रात्री उशिरापर्यंत दिल्लीत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.Game at night: Shinde with Amit Shah about the cabinet – Fadnavis is upset in the middle of the night !!; What is a surprise element?

    रात्री 9.30 वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री 2.00 वाजेपर्यंत चालली होती. यामध्ये मंत्रिमंडळातील खातेवाटप नावे यावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिंदे गट आणि भाजप या दोघांकडूनही मोठे सरप्राईज एलिमेंट असू शकते अशी कुजबूज दिल्लीच्या वर्तुळात सुरू झाली आहे.



    महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी रात्री या दोघांनी अमित शाह यांची भेट घेतली. रात्री 9.30 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा 2.00 वाजता संपली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्ताराने चर्चा झाली आहे.

    या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणती आणि किती खाती मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे-फडणवीस अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून नव्या मंत्र्यांच्या शपथविधी कदाचित सोमवारी होण्याची शक्यता आहे.

    अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत.

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांसह बंड केलं. त्यामुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीला आता आठवडा झाला असला तरी अजूनही मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप झाले नाही. याचबाबत अमित शाहांसोबत चर्चा झाली आहे.

    Game at night: Shinde with Amit Shah about the cabinet – Fadnavis is upset in the middle of the night !!; What is a surprise element?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही