विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातील बॅँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पळून जाणाºया भगौड्या नीरव मोदीची साथ त्याच्या बहिणीनेही सोडली आहे. भारत सरकारला १७ कोटी रुपये परत देत नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदी हिने माफीची साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.Fugitive Nirav Modi’s sister also left him , returned Rs 17 crore to India and became an apology witness
सक्तवसुली संचनालयाने (ईडी) दिलेल्या माहितीनुसार नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदीने युके बँक खात्यातून 17 कोटी रुपये भारत सरकारला पाठवले आहेत. भारत सरकारने पूर्वी मोदीला पीएनबी घोटाळ्यात सहकार्य केल्यास तिच्यावर कारवाई करणार नाही, असें आश्वासन दिले होते. पूर्वी मोदीने ईडीला सांगितले की, माझ्या नावावर लंडनमध्ये एक बँक खाते आहे.
ते माझा भाऊ नीरव मोदीने माझ्या नावावर उघडलं होते. त्या खात्यावरील पैसे माझे नाही. त्यामुळे पूर्वीने भारताला दिलेल्या आश्वासनानुसार या बँक खात्यातील 23 लाख 16 हजार 889 डॉलर भारत सरकारच्या खात्यावर पाठवले.
नीरव मोदी सध्या इंग्लंडमधील तुरुंगात आहे. त्याच्याविरोधात १४ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्या प्रकरणी खटला सुरू आहे. मागील आठवड्यातत इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळत त्याला मोठा झटका दिला होता.
त्याने स्वत:ला भारताला प्रत्यार्पित करण्याला आव्हान दिले होते. एप्रिलमध्ये इंग्लंडच्या गृह सचिव प्रीति पटेल मोदीच्या भारत प्रत्यर्पणाचे आदेश दिले होते. पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधींचा घोटाळा करुन नीरव मोदी जानेवारी 2018 मध्ये लंडनमध्ये पळाला. लंडनमध्ये 19 मार्च 2019 रोजी त्याला अटक करण्यात आली. सध्या तो साऊथ-वेस्ट लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगात आहे.
काही दिवसांपूर्वी पूर्वी मोदीने सरकारी साक्षीदार बनण्यासंबंधित अर्ज न्यायालयात सादर केला होता. आता या अजार्ला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला हाताळणारे विशेष न्यायाधीश व्ही सी बर्डे यांनी सोमवारी मंजूरी दिली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणी पूर्वी मोदीने माफी मागितल्यानंतर ती आता सरकारी साक्षीदार असेल.
बेल्जियमची नागरीक असलेली पूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने दाखल एका खटल्यात आरोपी आहे. आरोपी सध्या परदेशात आहे. तिला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात येतील. त्यासाठी फियार्दी पक्ष आवश्यक ती पावलं उचलेल.
आपल्या माफीच्या अर्जात पूर्वी मोदींनी सांगितलं की, ती मुख्य आरोपी नाही आणि तपास यंत्रणांनी तिची या प्रकरणात मर्यादित भूमिका असल्याच उघड केलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाला आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करुन देऊन त्यांना पूर्णपणे सहकार्य केले आहे.
Fugitive Nirav Modi’s sister also left him , returned Rs 17 crore to India and became an apology witness
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कृषी कायद्यांच्या बाजूने पवार, पण काँग्रेसला वाटतेय अडचण; थोरात म्हणाले – राज्यासाठी आम्ही दुसरा कायदा आणणार!
- तरुण नैराश्यात जात आहेत, स्थगित MPSC परीक्षा त्वरित घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या – रोहित पवार
- सीएम केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींना मागणी, या वर्षी डॉक्टरांना देण्यात यावा भारतरत्न
- भाजप नेत्यांशी भेटीवर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण भारत-पाकिस्तानसारखे नाही
- फिलिपाइन्समध्ये मोठी विमान दुर्घटना, ९२ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे विमान कोसळले, १७ जण ठार