• Download App
    पक्ष हवालदिल, नेते सैरभैर, पळापळ झाली सुरू, कर्नाटकातील माजी केंद्रीय मंत्र्याचा कॉँग्रेसचा राजीनामा|Former Union Minister of Karnataka resigns from Congress

    पक्ष हवालदिल, नेते सैरभैर, पळापळ झाली सुरू, कर्नाटकातील माजी केंद्रीय मंत्र्याचा कॉँग्रेसचा राजीनामा

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाचही राज्यांत मिळून काँग्रेसला ५० ते ६० जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे पक्ष हवालदिल झाला असून नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे.Former Union Minister of Karnataka resigns from Congress

    काँग्रेसला कर्नाटकमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद न दिल्याने नाराज असलेल्या इब्राहिम यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे.



    कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सी. एम. इब्राहिम यांनी सोनिया यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितले की, गेल्या १२ वर्षांमध्ये पक्षातील समस्यांबाबत मी तुम्हाला अनेक पत्रं लिहिली आहेत. त्यांचे उत्तर देताना तुम्ही समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाय केले जाती, असे आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत मला कुठलाही बदल दिसला नाही. त्यामुळे मी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व तत्काळ प्रभावाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

    माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सी.एम. इब्राहिम केंद्र सरकारमध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्री होते. २००८ मध्ये त्यांनी सिद्धारामय्या यांच्यासोबत जेडीयू सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र गेल्या काही काळापासून ते काँग्रेस आणि सिद्धारामय्या यांच्यावर नाराज होते.कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर निवड होईल, असे त्यांना वाटत होते.

    मात्र तसे झाले नाही. काँग्रेसने त्या पदावर बी. के. हरिप्रसाद यांची निवड केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले की, सिद्धारमैय्यांसाठी आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो होतो. मात्र आता काँग्रेस माझ्यासाठी बंद आध्याय बनला आहे.

    Former Union Minister of Karnataka resigns from Congress

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के