प्रतिनिधी
मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने 4000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे Former Union Agriculture Minister in ED documents
संजय राऊत यांच्यावरील आता या आरोपपत्रानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता याच आरोपपत्रावर बोट ठेवत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची या पत्राचाळ प्रकरणात तत्काळ चौकशी करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
भातखळकरांचे ट्विट
अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांनी झेपणारे आहे, असे सुरुवातीपासून वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात जे नाव आहे ते one and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये भातखळकरांनी टाईम्स ऑफ इंडियाची बातमी शेअर केली आहे.
ईडीच्या आरोपपत्रात काय?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. आरोपपत्रातील उल्लेखानुसार, 2006-2007 या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. 12.08.2066 रोजी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीला संजय राऊत उपस्थित होते. यासंबंधीचा उल्लेख 14.08.2006 च्या गृहनिर्माण सचिवांच्या पत्रात आहे. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर यामध्ये 1034 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
तसेच, या प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत होत्या, त्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना सगळी माहिती होती, असे देखील सांगण्यात आले आहे. मात्र, ते माजी मुख्यमंत्री कोण?, ज्यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली, त्याचा उल्लेख मात्र ईडीने आरोपपत्रात केलेला नाही. त्यामुळे आता तो माजी मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Former Union Agriculture Minister in ED documents
महत्वाच्या बातम्या
- ममतांच्या बंगालमध्ये अदानींची 25000 कोटींची गुंतवणूक; ताजपूर महाबंदर सुरू करणार
- इतर प्रदेश समित्यांपाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीही हात उंचावून राहुल गांधींच्या पाठीशी!
- ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच संपवतेय हे आकडेवारीनिशी स्पष्ट; आशिष शेलारांचे शरसंधान
- पवारांना धमकीचा फोन, पण बातमीचे पवारांनीच केले खंडन!