माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दीर्घकाळ रुग्णालयात दाखल होते.त्यांना डेंग्यू झाला होता.Former Prime Minister Manmohan Singh recovers from dengue, wife Gursharan Kaur thanks AIIMS doctors and staff
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग बरे होऊन घरी परतले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, माजी पंतप्रधानांच्या पत्नी गुरशरण कौर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ते आता घरी परतले आहेत आणि डेंग्यूपासून बरे होत आहेत.यासोबतच त्यांनी एम्सच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
त्या म्हणाल्या की , डॉ.मनमोहन सिंग घरी आले असून ते डेंग्यूमधून बरे होत आहेत.आम्ही सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि एम्सचे सपोर्ट स्टाफ आणि माजी पंतप्रधानांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो.
विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दीर्घकाळ रुग्णालयात दाखल होते.त्यांना डेंग्यू झाला होता.यादरम्यान त्यांना ताप आला आणि त्यानंतर ते अशक्त झाले, त्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते.
Former Prime Minister Manmohan Singh recovers from dengue, wife Gursharan Kaur thanks AIIMS doctors and staff
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान