काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या ३७व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय राजधानीतील शक्तिस्थळावर श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विट केले, “माझ्या आजीने शेवटच्या क्षणापर्यंत निर्भयपणे देशाची सेवा केली – त्यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. नारी शक्तीचे उत्तम उदाहरण, इंदिरा गांधी यांना त्यांच्या हुतात्मा दिनी विनम्र श्रद्धांजली. Former pm indira gandhi 37th death anniversary today congress leader rahul gandhi paid tribute
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या ३७व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय राजधानीतील शक्तिस्थळावर श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विट केले, “माझ्या आजीने शेवटच्या क्षणापर्यंत निर्भयपणे देशाची सेवा केली – त्यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. नारी शक्तीचे उत्तम उदाहरण, इंदिरा गांधी यांना त्यांच्या हुतात्मा दिनी विनम्र श्रद्धांजली.
माजी पंतप्रधान आणि ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी यांची आज 37 वी पुण्यतिथी आहे. इंदिरा गांधी यांनी जानेवारी 1966 ते मार्च 1977 आणि पुन्हा जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान म्हणून काम केले. 31 ऑक्टोबर ही तारीख भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा दिवस म्हणून नोंदवलेली आहे.
अंगरक्षकांनीच केली होती हत्या
31 ऑक्टोबर 1984 रोजी अकबर रोडवरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्याच दोन अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली, ज्यामुळे देशाच्या अनेक भागात शीखविरोधी दंगली उसळल्या. इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 या काळात सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली. 1980 मध्ये त्या पुन्हा या पदावर आल्या आणि 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या झाली. याआधी 1980 मध्ये इंदिरा गांधींना मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तेव्हा त्या थोडक्यात बचावल्या होत्या.
अधिकृत आकडेवारीनुसार, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या दंगलीत सुमारे 2000 लोक मारले गेले, तर हजारो लोकांनी शहर सोडले. इंदिरा गांधींना राजकारणाचा वारसा लाभला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात असे अनेक मोठे निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या त्या एकुलत्या एक कन्या होत्या.
Former pm indira gandhi 37th death anniversary today congress leader rahul gandhi paid tribute
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द