कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती. सध्या बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू आहे. बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सौंदर्या बंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत शहरातील माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या.Former Karnataka Chief Minister Yeddyurappa’s granddaughter Saundarya commits suicide, body found in an apartment in Bangalore
वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती. सध्या बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू आहे. बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सौंदर्या बंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत शहरातील माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या.
दोन वर्षांपूर्वीच सौंदर्या यांचे लग्न झाले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरिंग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बंगळुरूच्या हाय ग्राउंड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सौंदर्या या येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची कन्या होत्या.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे कुटुंबीय आणि प्रदेश भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे दिग्गज नेते येडियुरप्पा यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसते.
डॉ. सौंदर्या व्हीवाय यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या वसंत नगर फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.सौंदर्याने हे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सौंदर्याने 2018 मध्ये डॉ. नीरज एस यांच्याशी लग्न केले.
दोघेही एकाच रुग्णालयात काम करत होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठ वाजता नीरज हॉस्पिटलला रवाना झाले. नीरज कामावर निघून गेल्याच्या दोन तासांनी सौंदर्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे.
घरातील मोलकरणीने वारंवार येऊन दरवाजा ठोठावल्यानंतरही काही उपयोग झाला नाही, तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यांनी डॉ. नीरज यांना माहिती दिली. यानंतर नीरजनेही सौंदर्याला फोन केला. मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर अपार्टमेंटचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर मृतदेह बोरिंग रुग्णालयात नेण्यात आला, तेथे पोस्टमार्टम करण्यात येत आहे. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काही मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ अधिकारी येडियुरप्पा यांच्या घरी पोहोचले आणि शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Former Karnataka Chief Minister Yeddyurappa’s granddaughter Saundarya commits suicide, body found in an apartment in Bangalore
महत्त्वाच्या बातम्या
- Budget 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, ‘या’ मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याची रणनीती
- ऐतिहासिक : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला लवकरच मिळणार पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घोषणा
- Tipu Sultan Controversy : प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप – सत्तेत येण्यासाठी भाजपकडून हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा प्रयत्न
- NCC Event : पंतप्रधान मोदींकडून NCC दलाच्या मार्चपास्टचे निरीक्षण, करिअप्पा मैदानावर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला