• Download App
    हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला ८६ व्या वर्षी झाले दहावी इंग्रजी उत्तीर्ण, मिळाले ८८ गुण|Former Haryana Chief Minister Omprakash Chautha passed 10th English at the age of 86, got 88 marks

    हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला ८६ व्या वर्षी झाले दहावी इंग्रजी उत्तीर्ण, मिळाले ८८ गुण

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी वयाच्या 86 व्या वर्षी दहावीची इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या विषयात पास न झाल्यामुळे त्याचा बारावीचा निकाल शालेय शिक्षण मंडळाने रोखला होता. आता हा निकाल लागण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.Former Haryana Chief Minister Omprakash Chautha passed 10th English at the age of 86, got 88 marks

    शनिवारी हरियाणा शालेय शिक्षण मंडळाने परीक्षांचे निकाल जाहीर केले. बोर्डाचे अध्यक्ष जगबीर सिंह म्हणाले की, माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.



    पंचकुलामध्ये कामगारांच्या मेळाव्याला संबोधित करताना चोटाला यांनीही आपला निकाल उपस्थितांना सांगितला. चौटाला यांना हरियाणा ओपन बोडार्तून बारावी उत्तीर्ण होण्यासाठी दहावीच्या इंग्रजीचा पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक होते,असे त्यांनी सांगितले.

    बारावीचा निकालही सोमवारी जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी चौटाला यांना मंडळाकडे अर्ज करावा लागेल. चौटाला हा विषय 88 गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. आता त्यांचा 12 वीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

    2013 ते 2 जुलै 2021 दरम्यान जेबीटी भरती घोटाळ्यात शिक्षा भोगत असताना ओम प्रकाश चौटाला यांनी तिहार तुरुंगात शिक्षण घेतल्यानंतर 10 वी उत्तीर्ण केली होती. यावर्षी त्यांनी हरियाणा ओपन बोर्डाकडून बारावीची परीक्षाही दिली होती, परंतु नियमांमुळे निकाल रोखण्यात आला आहे.

    चौटाला यांनी एनआयओएस (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल) मधून 2017 मध्ये वयाच्या 82 व्या वर्षी उर्दू, विज्ञान, सामाजिक अभ्यास आणि भारतीय संस्कृती विषयांमध्ये 53.40% गुणांसह दहावी उत्तीर्ण केली होती.

    5 ऑगस्ट रोजी हरियाणा बोडार्ने खुल्या 12 वीच्या परीक्षेच्या निकालामध्ये चौटाला यांचा निकाल राखून ठेवला होता, कारण चौटाला यांनी 10 वी उत्तीर्ण परीक्षेत इंग्रजी किंवा हिंदीचा पेपर दिला नव्हता, तर उर्दू विषय घेतला होता.

    चौटाला यांनी परीक्षेसाठी अर्ज केला आणि 18 ऑगस्ट रोजी सिरसा येथील आर्य कन्या शाळेत संध्याकाळी सत्रात इंग्रजीचा पेपर दिला. च् सिरसा येथील इयत्ता नववीचे विद्यार्थी मल्कीत विर्क यांनी परीक्षा लेखक म्हणून त्यांचा पेपर लिहिला.

    Former Haryana Chief Minister Omprakash Chautha passed 10th English at the age of 86, got 88 marks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य