वृत्तसंस्था
गुवाहाटी : आसाममधील मातबर नेत्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुश्मिता देव यांनी धक्कादायकरित्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. Former Congress MP Sushmita Deo resigns; Mamata likely to join Trinamool Congress
परंतु, काँग्रेसमध्ये महिला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद देऊनही आसाम काँग्रेसच्या संघटनेत महत्त्वाचे पद दिले नाही किंवा आसामच्या राजकारणात पुरेसे महत्त्व दिले नाही, म्हणून त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच त्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसला जाऊन मिळतील, अशीही चर्चा आहे.
ममता बॅनर्जी यांनी सध्या तृणमूळ काँग्रेसच्या विस्ताराची मोहीम सुरू केली आहे. त्यांनी आसाम, त्रिपूरा या राज्यांवर संघटना विस्तारासाठी लक्ष घातले आहे. त्रिपूरात बंगालमधून नेते आणि कार्यकर्ते पाठवून तिथले ब्लिपव देव सरकार उखडण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे.
तसेच आसाममध्ये तृणमूळ काँग्रेसचा संघटनात्मक विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. सुश्मिता देव यांच्यासारख्या तडफदार नेत्याचा ममतांना आपल्या पक्षाच्या विस्तारात मोठा उपयोग होऊ शकतो. सुश्मिता देव यांना त्या तृणमूळ काँग्रेसमध्ये मोठे पद देऊ शकतात. यातून सुश्मिता देव यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
सुश्मिता देव या आसामचे मोठे नेते संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. संतोष मोहन देव हे राजीव गांधींचे निकटवर्ती नेते होते. आसाम काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा होता. सिल्चरमधून ते निवडून येत असत. त्यांनी केंद्रात बरीच वर्षे मंत्रीपद भूषविले होते. संतोष मोहन देव यांच्यानंतर सुश्मिता देव यांनी त्यांचा राजकीय वारसा संभाळला. त्या सिल्चरमधून २०१४ मध्ये लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. यापुढे त्यांची वाटचाल कदाचित तृणमूळ काँग्रेसमधून सुरू राहील, असे मानले जात आहे.
Former Congress MP Sushmita Deo resigns; Mamata likely to join Trinamool Congress
महत्त्वाच्या बातम्या
- पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व
- बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका
- तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले
- डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले