• Download App
    राज कुंद्रापाठोपाठ बंगाली अभिनेत्री नंदिता दत्तालाही पोर्न फिल्म प्रकरणी अटक, धमकी देऊन मुलींचे जबरदस्तीने अश्लिल शुटींग|Following Raj Kundra, Bengali actress Nandita Dutta was also arrested in a porn film case.

    राज कुंद्रापाठोपाठ बंगाली अभिनेत्री नंदिता दत्तालाही पोर्न फिल्म प्रकरणी अटक, धमकी देऊन मुलींचे जबरदस्तीने अश्लिल शुटींग

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता: नॅन्सी भाभी नावाने अश्लिल चित्रपटांत काम करणारी बंगाली अभिनेत्री नंदिता दत्ता हिलाही पोलीसांनी पॉर्न फिल्म प्रकरणी अटक केली आहे. अनेक अभिनेत्रींना कधी आमिष दाखवून तर कधी बळजबरीने अश्लिल व्हिडीओ शुट करण्यास नंदिता दत्ताने भाग पाडले.Following Raj Kundra, Bengali actress Nandita Dutta was also arrested in a porn film case.

    मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा ला पॉर्न आणि अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणानंतर पॉर्न फिल्म बनवणाऱ्या अनेक लोकांची आणि अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत.



    कोलकाता पोलिसांनी ३० वर्षीय अभिनेत्री नंदिता दत्ता ला अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. नंदिता दत्तासह तिचा सहकारी मैनाक घोष यालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांवर नवीन मुलींना वेब सीरिजमध्ये कामाचे आमिष दाखवून आणि धमकी देऊन पॉर्न व्हिडिओ बळजबरीने शूट करून घेण्याचे आदेश आहेत.

    नंदिताने स्वत: देखील अश्लील सिनेमांमध्ये काम केले आहे. तिच्या पात्राचे नाव नॅन्सी भाभी होते. २६ जुलै रोजी दोन मॉडेलनी नंदिता आणि मैनाक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर दोघांनाही पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.

    तक्रार करणाऱ्या मॉडेलने आरोप केला आहे की तिचा न्यूड व्हिडिओ जबरदस्तीने बल्लीगंजच्या एका स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला. शहरातील न्यू टाऊन हॉटेलमध्ये तिच्या मैत्रिणीकडून एका अ‍ॅडल्ट व्हिडिओमध्ये जबरदस्तीने काम करून घेतल्याचा आरोपही पीडितेने यावेळी केला.

    आम्ही नंदिता आणि मैनाक यांना त्यांच्या इतर सहकाºयांबद्दल विचारू आणि हे लोक कुठल्या ठिकाणी पोर्नचं शूट करायचे याचाही तपास करू. हे व्हिडिओ कुठे विकले गेले आणि ही टोळी कोणत्या मोठ्या पॉर्न रॅकेटचा भाग आहेत का हे देखील तपासले जाईल, असे पोलीसांनी सांगितले.

    Following Raj Kundra, Bengali actress Nandita Dutta was also arrested in a porn film case.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार