• Download App
    ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांच्या फायझरची गोळीही ठरते प्रभावी Fizer Tablet good for cure corona

    ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांच्या फायझरची गोळीही ठरते प्रभावी

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी तयार केलेली गोळी ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांच्या उपचारांवरही प्रभावी ठरते, असा दावा अमेरिकेतील फायझर या औषध उत्पादक कंपनीने केला आहे. या गोळीची दोन हजारांहून अधिक लोकांवर चाचणी घेतली असून या प्रयोगाचा अहवाल समाधानकारक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Fizer Tablet good for cure corona

    कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांवर उपचार करताना ‘फायझर’ने तयार केलेल्या गोळीचा वापर केल्यास रुग्णालयात भरती करावे लागण्याची शक्यता कमी होते आणि मृत्यूचा धोकाही ८९ टक्क्यांनी कमी होतो, असा कंपनीचा दावा आहे.



    ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्ग झालेल्यांवर उपचार करतानाही ही गोळी तितकीच प्रभावशाली ठरत असल्याचे ‘फायझर’चे म्हणणे आहे. अमेरिकेत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर ‘फायझर’च्या दाव्यावर चर्चा होत आहे. या कंपनीने तयार केलेल्या गोळीच्या वापराला अमेरिकेच्या औषध विभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही.

    Fizer Tablet good for cure corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते