• Download App
    भोरच्या नाना-नानी पार्कला महाविद्यालयीन तरूण-तरुणींमुळे ठोकले कुलूपNana-Nani Park of Bhor was locked by college students

    भोरच्या नाना-नानी पार्कला महाविद्यालयीन तरूण-तरुणींमुळे ठोकले कुलूप

    नाना-नानी पार्कमध्ये बसण्याची चांगली सोय आणि उत्तम वातावरण असल्यामुळे तरुण-तरुणींना बसायला हक्काची जागा मिळायची.Nana-Nani Park of Bhor was locked by college students


    विशेष प्रतिनिधी

    भोर : भोर शहरातील नाना-नानी पार्क प्रसिद्ध आहे.दरम्यान महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा मोठा वावर असल्याने पार्कची स्वच्छता धोक्यात आली आहे.तसेच तरुण-तरुणींच्या विचित्र चाळ्यांचा स्थानिक व रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांना त्रास होत असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी (ता.२३) दुपारी पार्कमधील सर्वांना बाहेर काढून पार्कला कुलूप लावले.

    पार्कला कुलूप लावण्याचं नेमक कारण काय

    लॉकडाउननंतर शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत.दरम्यान शाळा, महाविद्यालयांत शहर व आजूबाजूच्या परिसरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पार्कमध्ये येऊ लागले . नाना-नानी पार्कमध्ये बसण्याची चांगली सोय आणि उत्तम वातावरण असल्यामुळे तरुण-तरुणींना बसायला हक्काची जागा मिळायची.



     

    बाग सार्वजनिक असल्यामुळे तरुण-तरुणींना बोलणारेही कोणी नव्हते.सुरुवातीला सगळ्यांना असे वाटले की , एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुले-मुली बागेत वेळ घालवित असतील परंतु बागेमध्ये लपुनछपून चाळे सुरू झाले होते.तसेच काहींमध्ये वाद होऊन हाणामारीही झाली होती. याची माहिती मिळताच नगरपालिकेच्या महेंद्र बांदल यांनी कर्मचाऱ्यांसमवेत नाना-नानी पार्कमध्ये सर्वांना बाहेर काढून पार्कला कुलूप लावले.

    या बाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत केरुळकर म्हणाले की, नाना-नानी पार्कच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात येणार आहे. पार्कसाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाणार असून, पार्क उघडण्याची वेळही निश्चित केली जाणार आहे.

    Nana-Nani Park of Bhor was locked by college students

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन नियोजनावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी आणखी एक पाऊल!!

    पवनराजेंची 35 लाखांची सुपारी देऊन हत्या, २० वर्षांनंतरही न्यायाची प्रतीक्षा; आरोपी पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवर कोर्टात!!

    Maharashtra Assembly : राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब