प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अजून अनेक राजकीय पक्षांची उमेदवारी निश्चिती व्हायची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांचा प्रचार अजून दूरच आहे. परंतु त्या आधीच ट्विटर या सोशल मीडिया हँडलवर राजकीय पक्षांचे आपापसात वॉर सुरू झाले आहे. Five state election campaigns still far away; War on Twitter !! Bahujan Samaj Paksha Congress loud !!
#Nation_Wants_BSP,
#आरहीहै_कांग्रेस, #Kejriwal Selling Tickets हे तीन हॅशटॅग सध्या ट्विटर वर जोरदार ट्रेंड होताना दिसत आहेत. मायावतींचा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात फारशी चमकदार कामगिरी करू शकणार नाही, असे अनेक निवडणूक सर्व्हे सांगत आहेत. परंतु, हे सर्व खोटे असून भाजप किंवा समाजवादी पक्ष दोन्ही सत्तेवर येणार नाहीत तर बहुजन समाज पक्ष सत्तेवर येईल, असा दावा पक्षाचे नेते सतीश चन्द्र शर्मा मिश्रा यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर #नेशन वाँट्स बीएसपी हा हॅशटॅग ट्विटर वर जोरदार ट्रेंड होतो आहे. त्याबरोबरच #आ रही है काँग्रेस ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे. प्रियंका गांधी यांनी आजच उत्तर प्रदेश 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये 50 उमेदवार महिला आहेत. या पार्श्वभूमीवर #आ रही है काँग्रेस हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतो आहे.
पंजाब मध्ये मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार अरविंद केजरीवाल यांनी जनतेला दिले आहेत. त्यांचे स्वतःचा कल भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करण्याकडे आहे. परंतु तरीही त्यांनी जनतेला फोन करून आम्हाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवायला मदत करा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. परंतु या पार्श्वभूमीवर #केजरीवाल सेलिंग तिकेट्स असा हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.
Five state election campaigns still far away; War on Twitter !! Bahujan Samaj Paksha Congress loud !!
महत्त्वाच्या बातम्या
- प्रताप सरनाईकांवर ठाकरे सरकार मेहरबान, विहंग गार्डनवरचा ४ कोटी ३३ लाखांचा दंड माफ, पण का?
- दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकर भारतीय एजन्सीच्या हातातून निसटला, दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचला
- PUNE : आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी , जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आदेश