• Download App
    फारूख अब्दुल्ला मला पाकिस्तानशी बोलण्याचा सल्ला देतात, पण मी काश्मीरी युवकांशी मैत्रीसंवाद साधणार; अमित शहांचा टोला। Farooq Abdullah advises me to talk to Pakistan, but I will befriend Kashmiri youth; Amit Shah's Tola

    फारूख अब्दुल्ला मला पाकिस्तानशी बोलण्याचा सल्ला देतात, पण मी काश्मीरी युवकांशी मैत्रीसंवाद साधणार; अमित शहांचा टोला

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, आपण काश्मीरी युवकांशी संवाद साधण्यासाठी आलो असल्याचा टोला अमित शहांनी डॉ. अब्दुल्ला यांना लगावला आहे. Farooq Abdullah advises me to talk to Pakistan, but I will befriend Kashmiri youth; Amit Shah’s Tola

    तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या वेळी युवकांच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. अमित शहा म्हणाले, की मी आज सकाळी वर्तमान पत्रात वाचले की डॉ. फारूख अब्दुल्लांनी मला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. अब्दुल्ला मोठे नेते आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पण मी काश्मीरमध्ये युवकांशी संवाद साधायला आलो आहे. इथे कोणतेही बुलेटप्रुफ जॅकेट नाही. कोणतीही जादा सुरक्षा व्यवस्था लावलेली नाही. मी थेट काश्मीरी युवकांशी बोलतो आहे.

    आत्तापर्यंत मला अनेकांनी टोमणे मारले. मी जम्मू – काश्मीरच्या जनतेच्या विरोधात असल्याच्या बाता त्यांनी मारल्या, अशी टीका करून अमित शहा म्हणाले, की आधीच्या राज्यकर्त्यांनी जम्मू – काश्मीरच्या जनतेशी समान न्याय केला का… त्यांनी सतत भेदभाव केला. जम्मू आणि लडाखच्या जनतेला विकासापासून, सरकारी नोकऱ्या, सुविधांपासून वंचित ठेवले. तीन परिवारांनी मिळून काश्मीरची लूट केली. त्याचा जाब या परिवारांना विचारण्याची वेळ आता आली आहे.

    केंद्रातील मोदी सरकारने जम्मू – काश्मीर आणि लडाख या केंद्र शासित प्रदेशांसाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी भेदभावरहित केली जाते आहे. रोजगाराच्या नव्या संधी जम्मू – काश्मीरच्या युवकांना समानतेने उपलब्ध होत आहेत, याकडे अमित शहा यांनी आवर्जून लक्ष वेधले.

    Farooq Abdullah advises me to talk to Pakistan, but I will befriend Kashmiri youth; Amit Shah’s Tola

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते

    Rajasthan : राजस्थानमध्ये मोबाइलने वाघाचे फोटो-व्हिडिओ काढण्यावर बंदी; सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर वन विभागाचे आदेश, उल्लंघन केल्यास FIR

    Mayawati : मायावती म्हणाल्या- कंबर कसा, विधानसभा निवडणुका जवळ आहेत:पक्षाला कमकुवत करण्याचा कट सुरू