जे साखर कारखाने चालू हंगामातील ‘एफआरपी’ जाहीर करणार नाहीत व थकीत रक्कम देणार नाहीत असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.Farmers should receive crop insurance amount within eight days; Raju Shetty’s warning
विशेष प्रतिनिधी
परभणी : कल पिंपळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस व सोयाबीन परिषद पार पडली.या परिषदेला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की , मराठवाडय़ातील शेतकरी संघटित नसल्यामुळे साखर कारखानदार या शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देत नाहीत. शेतकऱ्यांनी संघटित होऊन साखर कारखानदारांवर दबाव वाढविण्याची गरज आहे.
यावेळी बोलत असतांना शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार उसाचे पैसे देण्यासंदर्भात साखर कारखान्यांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे. जे साखर कारखाने चालू हंगामातील ‘एफआरपी’ जाहीर करणार नाहीत व थकीत रक्कम देणार नाहीत असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना लुटण्याचा हा धंदा वर्षांनुवर्षे सुरूच
यावेळी शेट्टी म्हणाले की,’जेव्हा सोयाबीनचे दर दहा ते अकरा हजार रुपये क्विंटल होते, तेव्हा शेतकऱ्यांकडे सोयाबीन नव्हते आणि आज शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आले तर त्याचे दर कोसळले आहेत. याला कारण केंद्र सरकारचे आयातीचे धोरण आहे.
केंद्र सरकारने जाणीवपूर्वक सोयापेंड आयात करून सोयाबीनचे बाजार भाव पाडले आहेत. शेतकऱ्यांना लुटण्याचा हा धंदा वर्षांनुवर्षे सुरू आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी सातत्याने भरडला जात आहे.’
रिलायन्स पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक भूमिका घेतील
दरम्यान, मराठवाडय़ातील शेतकरी संघटित नसल्यामुळे साखर कारखानदार या शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देत नाहीत. शेतकऱ्यांनी संघटित होऊन साखर कारखानदारांवर दबाव वाढविण्याची गरज आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत मिळाली पाहिजे, अन्यथा रिलायन्स पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक भूमिका घेतील, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.
Farmers should receive crop insurance amount within eight days; Raju Shetty’s warning
महत्त्वाच्या बातम्या
- सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध,उध्दव ठाकरेंकडून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा, राजू शेट्टी यांची टीका
- ममता बॅनर्जींनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेसला उतरविले गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, तृणमूल कॉँग्रेसचा मुख्य चेहरा होणार
- भुजा भुजामध्ये समता म्हणून भुजबळांवर उल्लेख पण सावकरांचा उल्लेखच नव्हता, साहित्य संमेलनाच्या गीतात, सावकरप्रेमींच्या संतापानंतर आयोजकांना उपरती
- गॅँगस्टरच्या पत्नीचा धक्कादायक आरोप, पतीनेच उच्चपदस्थांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, राजीव शुक्ला, हार्दिक पंड्या, मुनाफ पटेल यांनी केला बलात्कार
- सत्तेचा माज आला असे वागू नका, एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करा, सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा