• Download App
    कॉर्पोरेट्ससाठी आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ , १५ मार्च अंतिम तारीख; सामान्य करदात्यांना सवलत नाही|Extension in filing income tax returns for corporates, March 15 deadline

    कॉर्पोरेट्ससाठी आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ , १५ मार्च अंतिम तारीख; सामान्य करदात्यांना सवलत नाही

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: केंद्राने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी कॉर्पोरेट्सना आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मंगळवारी ही माहिती दिली.Extension in filing income tax returns for corporates, March 15 deadline

    याचा अर्थ कॉर्पोरेट् करदाते आता १५ मार्च २०२२ पर्यंत आर्थिक वर्ष २०२०-२०२१ किंवा मूल्यांकन वर्ष २०२१-२०२२ साठी त्यांचे आयकर रिटर्न भरू शकतात. अर्थ मंत्रालयाने कर लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे.



    अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या निवेदनानुसार, कोविडच्या वाढत्या प्रकरणांमुळे आणि करदात्यांना येणाऱ्या अडचणींमुळे मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिसूचनेत असेही म्हटले आहे की प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या तरतुदींनुसार विविध ऑडिट अहवालांच्या ई-फायलिंगमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे, वेळ मर्यादा देखील वाढविली आहे.

    सामान्य करदात्यांना सवलत नाही

    तारखेची केलेली मुदतवाढ सामान्य करदात्यांना नाही. ही सवलत बिझनेस क्लाससाठी आहे. CBDT च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की मागील वर्ष २०२०-२०२१ साठी कायद्याच्या कोणत्याही तरतुदीनुसार लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख,

    जी १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आली होती, ती आता १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑडिट रिपोर्ट अपलोड करण्याची नवीन तारीख १५ फेब्रुवारी आहे आणि ITR सबमिट करण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे.

    Extension in filing income tax returns for corporates, March 15 deadline

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले