• Download App
    चोपड्यात एसटीच्या वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नोटीस आल्याने धक्का बसल्याचा नातेवाईकांचा दावा|ST conductor dies of heart attack in Chopda; Relatives claim to have been shocked by the notice

    चोपड्यात एसटीच्या वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नोटीस आल्याने धक्का बसल्याचा नातेवाईकांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : चोपडा येथील एसटी आगाराचे वाहक आर. के. वाणी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचे निधन झाले. एसटी प्रशासनाकडून नोटीस मिळाल्याच्या धक्क्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांचे नातेवाईकांचे म्हणणं आहे.ST conductor dies of heart attack in Chopda; Relatives claim to have been shocked by the notice

    या घटनेनंतर चोपडा आगारात व्यवस्थापक यांच्या केबिनमध्ये वाहक आर.के. वाणी यांच्या नातेवाईकांनी व कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. आगार व्यवस्थापक संदेश शिरसागर यांनी वरिष्ठांशी चर्चा करून अनुकंपा तत्त्वावर त्यांचा मुलाला नोकरीत घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.



    त्यानंतर आगार व्यवस्थापक यांच्या कँबिनमधून नातेवाईक व कर्मचारी बाहेर पडले. आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे नातेवाईक व कर्मचाऱ्यांनी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

    दरम्यान, जो पर्यंत एसटीचे विलिनीकरण होत नाही. तो पर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय चोपड्यातील कर्मचाऱ्यांनी घेतला होता. यानंतर वाणी यांना नोटीस बजावल्याने हा धक्का त्यांना सहन झाला नाही.

    ST conductor dies of heart attack in Chopda; Relatives claim to have been shocked by the notice

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली