• Download App
    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : पंजाब सरकारच्या बचावात शेतकरी नेते टिकैत, फुल आखाड्यात!! । Error in the security of the Prime Minister: Farmer leader Tikait in the defense of the Punjab government, in the full arena !!

    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : पंजाब सरकारच्या बचावात शेतकरी नेते टिकैत, फुल आखाड्यात!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवण्यात आली. तिचे उल्लंघन झाले. या मुद्द्यावरून देशभर राजकीय घमासान आणि काही कायदेशीर राजकीय गंभीर हालचाली सुरू असताना पंजाब सरकारच्या बचावासाठी शेतकरी आंदोलकांचे नेते आता आखाड्यात आले आहेत. Error in the security of the Prime Minister: Farmer leader Tikait in the defense of the Punjab government, in the full arena !!

    भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि भारतीय किसान युनियन क्रांतिकारीचे नेते सुरजित सिंग फुल हे दोन नेते पंजाब सरकारचा अप्रत्यक्षपणे बचाव करताना दिसत आहेत. काल फिरोजपूर – मोगा महामार्ग अडवून शेतकऱ्यांनी चांगले काम केले आहे. ते अभिनंदनास पात्र आहेत, असे वक्तव्य आधी सुरजित सिंग फुल यांनी केले होते. या नंतर मात्र त्यांनी आपले वक्तव्य फिरवले. ते म्हणाले, की फिरोजपूरच्या एसपींनी शेतकऱ्यांना फिरोजपूर – मोगा महामार्गावरून हटायला सांगितले होते. येथून पंतप्रधानांचा गाड्यांचा ताफा जाणार आहे, असे ते म्हणाले होते. परंतु आम्हाला ते गंमत करताहेत असे वाटले. त्यामुळे शेतकरी फिरोजपूर – मोगा महामार्गावरून बाजूला हटले नाहीत. एक प्रकारे सुरजित सिंग फुल यांच्या वक्तव्यातून फिरोजपुरच्या एसपींचा बचाव करण्याचा प्रयत्न दिसतो आहे.

    एकीकडे सुरजित सिंग फुल यांनी वक्तव्य फिरवलं आहे तर दुसरीकडे राकेश टिकैत यांनी पंतप्रधान राजकीय स्टंट करत असल्याचा आरोप केला आहे. मूळात पंतप्रधान तेथे गेलेच का? गेले असतील तर त्यांनी म्हणजे केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेची काय व्यवस्था केली होती?, अशाप्रकारे सवाल राकेश टिकैत यांनी उपस्थित केले आहेत. केंद्र सरकार आणि पंजाब सरकार स्वतःचा दृष्टिकोन फक्त मांडत आहे आणि आपली सुटका करून घेत आहे. पण यातून पंतप्रधानांचा राजकीय स्टंट दिसतो आणि स्वस्तात स्वतःची पब्लिसिटी करून घेण्याचा प्रयत्न दिसतो, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली आहे. सुरजित सिंग फुल आणि राकेश टिकैत यांच्या दोघांच्याही वक्तव्यातून केंद्र सरकारवर निशाणा आहे, पण पंजाब सरकारचा अप्रत्यक्षपणे बचाव करण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत.

    राजकीय गदारोळा पलिकडे जाऊन सुप्रीम कोर्टाने, राज्यपालांनी आणि राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची दखल घेतली आहे. त्यामुळे काही कायदेशीर गंभीर कारवाई करण्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी नेते आखाड्यात उतरून अप्रत्यक्षपणे पंजाब सरकारचा बचाव करण्याचे प्रयत्न करत आहेत.

    Error in the security of the Prime Minister: Farmer leader Tikait in the defense of the Punjab government, in the full arena !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य