• Download App
    Emraan Hashmi In Kashmir: काश्मीरमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीवर दगडफेक, पोलिसांनी आरोपीला केली अटक|Emraan Hashmi In Kashmir: Stone pelting on Bollywood actor Emraan Hashmi in Kashmir, police arrested the accused

    Emraan Hashmi In Kashmir: काश्मीरमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीवर दगडफेक, पोलिसांनी आरोपीला केली अटक

    वृत्तसंस्था

    पहलगाम : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अभिनेता सोमवारी संध्याकाळी शूटिंग संपवून बाहेर आला तेव्हा एका अज्ञाताने त्याच्यावर दगडफेक केली. मात्र, दगडफेक करणाऱ्याची ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेबाबत अनंतनाग पोलिसांनीही आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे.Emraan Hashmi In Kashmir: Stone pelting on Bollywood actor Emraan Hashmi in Kashmir, police arrested the accused

    त्यांच्या निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, ‘पहलगाम’मध्ये सुरू असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 07:15 वाजता शूट संपल्यानंतर, एका बदमाशाने क्रू मेंबर्सवर दगडफेक केली. या प्रकरणी पहलगाम पोलीस ठाण्यात एफआयआर (एफआयआर क्रमांक ७७/२०२२) दाखल करण्यात आला आहे. सोबतच या आरोपीचीही ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे.



    इमरान हाश्मी पहलगाममध्ये दक्षिण काश्मीरमध्ये शूटिंग करत असताना त्याच्यावर दगडफेक करण्यात आली होती. सूत्रांचे म्हणणे आहे की या संदर्भात कलम 77/22 U/S 147, 148, 370, 336, 323 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इमरान काश्मीरच्या पहलगाममध्ये त्याच्या आगामी ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

    ‘ग्राउंड झिरो’चे दिग्दर्शन तेजस देउस्कर करत आहेत. याशिवाय इमरान हाश्मी अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ आणि ‘टायगर 3’मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर इमरानची ‘टायगर 3’ मध्ये नकारात्मक भूमिका असणार आहे. अलीकडेच अभिनेता ‘डिबुक’ आणि ‘चेहरे’मध्ये दिसला होता आणि अभिनेत्याचे दोन्ही चित्रपट फारसे चालले नाहीत.

    Emraan Hashmi In Kashmir: Stone pelting on Bollywood actor Emraan Hashmi in Kashmir, police arrested the accused

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले