• Download App
    राजन खान यांच्याकडून राहुल गांधींची "वेगळी" भलामण; शरद पोंक्षेंचेे प्रत्युत्तर|Eminent writer rajan khan "praised" rahul Gandhi, but eminent actor sharad ponkshe gave befitting reply

    राजन खान यांच्याकडून राहुल गांधींची “वेगळी” भलामण; शरद पोंक्षेंचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी

    मुंबई : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने दिलेली शिक्षा त्यानंतर रद्द झालेली राहुल गांधींची खासदारकी आणि त्यानंतर राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेला अपमान या पार्श्वभूमीवर प्रख्यात साहित्यिक राजन खान यांनी राहुल गांधींची “वेगळी” भलामण केली आहे. खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधींना बंगला सोडावा लागणार आहे. पण बंगल्याच्या एका भागात राहुल गांधी हे काही अनाथ मुले सांभाळत आहेत. राहुल गांधींना बंगला सोडावा लागणार असल्यामुळे या अनाथ मुलांना देखील बंगला सोडावा लागत असल्याची खंत राजन खान यांनी फेसबुक पोस्ट लिहुन व्यक्त केली आहे. मात्र, राजन खान यांना प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले आहे. ते असे :Eminent writer rajan khan “praised” rahul Gandhi, but eminent actor sharad ponkshe gave befitting reply

    राजन खान सरांनी लिहिलेला लेख व मी दिलेलं ऊत्तर :

    राहुल गांधींचा बंगला गेली कित्येक वर्षं एका चांगल्या कामासाठी वापरला जात होता. बंगल्याच्या एका भागात देशभरातली गरीब, अनाथ आणि अपंग मुलं ते सांभाळत होते. त्यांच्या राहण्याचा, जेवणाचा व शिक्षणाचा खर्च ते स्वतः करत होते. या मुलांमध्ये कोणताही जात, धर्म, प्रदेश, भाषा असा भेद केला जात नाही. (देशभरातल्या अनेक होतकरू मुलांनाही ते आवश्यक ती मदत करत राहतात. निर्भया बलात्कार प्रकरणातल्या मुलीच्या भावाचा सगळा खर्च उचलून त्यांनी त्याला पायलट केलं.)



    या सगळ्या कामाची ते कुठंही वाच्यता, जाहिरात करत नाहीत. हा बंगला फक्त त्यांनाच सोडावा लागणार नाही, तर त्या गरजू मुलांनाही सोडावा लागणार आहे. अर्थात राहुल गांधी त्यावर काही मार्ग काढतील हे निश्चित. तो जिद्दी माणूस आहे, एवढं मला जवळून माहीत आहे.

    साहित्यिक – राजन सुमन खान

     शरद पोक्षेंचे प्रत्युत्तर

    ह्यांना मी दिलेलं ऊत्तर, राजनजी तुमच्या बद्दल आदर आहेच. पण तरीही वैचारिक मतभेद असूच शकतात म्हणून हे उत्तर.

    कसं असत ना राजनजी, खुप गुन्हे करणारा माणूस दोन गोष्टी चांगल्या करतो म्हणून त्याच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. गुन्हे हे गुन्हेच असतात. त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. गुन्हेगार काही मुलांना शिकवतोय त्यांचे संगोपन करतोय म्हणून त्या मुलांसाठी राष्ट्राची हानी करणारा गुन्हेगार सोडून देता येत नाही ना? ऊदा. दाऊद इब्राहिमला मानणारे काही ४% लोक महाराष्ट्रात आहेत. त्यांचं दाऊदने भलं केलय. दाऊदला पकडताना त्याच घर जप्त करताना त्या घरात राहणाऱ्या त्या निरपराध माणसांचा विचार करता येत नाही ना? “सुक्या बरोबर ओलं जळतं “अशी म्हण आहे. “त्या” मुलांचा विचार केला तर सगळेच गुन्हेगार गुन्हे करतील व पकडले जाण्यापूर्वी ४ चांगल्या गोष्टी करतील मग सर्वांना च सोडून द्याव लागेल ना? तर त्याला पर्याय सोडून देणं हा नाही न? ती मुलं बेघर होणार नाहीत ह्याची काळजी राहूलची बहीण आई व त्यांचे करोडपती नेते, कार्यकर्ते ह्यांनी घ्यावी एवढं सोप आहे हे. तुमचा हा लेख म्हणजे सर्व गुन्हेगारांसाठी सुटण्याचा राजमार्ग ठरेल.

     

    महाभारतात कर्ण चांगलाच होता पण श्रीकृष्णाने तो अडकलेले चाक काढत असताना त्याला मारायला अर्जूनाला सांगीतलं.कर्ण म्हणाला “कृष्णा हा धर्म नाही “तेव्हा कृष्ण म्हणाला “अभिमन्यूला चक्रव्यूहात फसवून मारणाऱ्या व द्रौपदीच वस्त्र हरण करणाऱ्या कौरवांना तू साथ दिलीस तेव्हा कूठे गेला होता तूझा धर्म? “हे अस असत. सुक्या बरोबर ओल जळणारच. त्या निरपराध मुलांची जबाबदारी सोनिया व कॉंग्रेसने ऊचलावी. त्यांचंही भलं होईल व राहुलला शिक्षाही होईल. नाहीतर भविष्यात एक वेगळा ट्रेंड सेट केला जाईल. भरपूर भ्रष्टाचार करायचा, मग खुप बंगले बांधायचे आपल्याच लूटलेल्या पैशातून बांधलेल्या अनधिकृत बंगल्यात काही गरीब सर्व जाती धर्माची मुलं ठेवायची. मग त्या अनधिकृत बंगल्यावर टाच आली की त्यात राहणाऱ्या मुलांचं काय? ती बेघर होतील म्हणून ती प्रॉपर्टी जप्त करायची नाही. मस्त आयडीया!!

    आपल्याला राहूल आवडू शकतो त्यावर हरकत नाही. पण नियमानुसार जर कार्यवाही होत असेल तर त्या मुलांची जबाबदारी सोनिया कंपनीने घ्यावी. त्यांना अवघड काहीच नाही. राहूलची समाजसेवा त्यांनी पुढे न्यावी आमचं काही म्हणणच नाही. त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतूकच करू.

    *आ.
    शरद मा. पोंक्षे

    Eminent writer rajan khan “praised” rahul Gandhi, but eminent actor sharad ponkshe gave befitting reply

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य