• Download App
    पाच राज्यांतील निवडणुकांचा कॉँग्रेसला राज्यसभेतही बसणार फटका, विरोधी पक्षनेते पदही आता राहणार नाही|Elections in five states will hit Congress in Rajya Sabha too, no longer Leader of Opposition

    पाच राज्यांतील निवडणुकांचा कॉँग्रेसला राज्यसभेतही बसणार फटका, विरोधी पक्षनेते पदही आता राहणार नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पाच राज्यातील निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवचा फटका कॉँग्रेसला राज्यसभेतही बसणार आहे. राज्यसभेतील दहा टक्के जागाही कॉँग्रेसकडे राहणार नसल्याने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद राहणार नाही.विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे ठेवू शकेल एवढं संख्याबळही काँग्रेसकडे लोकसभेत नाही.Elections in five states will hit Congress in Rajya Sabha too, no longer Leader of Opposition

    आता राज्यसभेतही हिच वेळ कॉँग्रेसवर येणार आहे. 2022मध्ये वेगवेगळ्या कालावधीत राज्यसभेच्या 75 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात काँग्रेसला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या निवडणुकानंतर काँग्रेसला लोकसभेनंतर राज्यसभेतही विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    राज्यसभेत ज्या पक्षाकडे 10 टक्के जागा आहेत, त्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद असतं. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसकडे एवढं संख्याबळ होऊ शकलं नाही. यावर्षाच्या अखेरीपर्यंत देशात राज्यसभेच्या 75 जागांवर निवडणुका होणार आहेत. काँग्रेसकडे सध्या 34 सदस्य आहेत. या निवडणुकानंतर काँग्रेसची संख्या कमी होऊन 25च्या खाली आल्यास काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद जाईल.



    राज्यसभेत एकूण 250 सदस्य असतात. यातील 238 सदस्य निवडून येतात. तर 12 सदस्य राष्टपती नियुक्त असतात. राज्यांचे आमदार राज्यसभा सदस्यांची निवड करतात. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांचा या निवडीवर परिणाम होणार आहे.पाच राज्यांतील निवडणुकीनंतर आता राज्यसभेच्या 13 जागांसाठी येत्या 31 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत.

    या 13 जगांपैकी 5 जागा पंजाबमधील आहेत. पंजाबमध्ये आपचे वर्चस्व असल्याने या पाचही जागांवर आपचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. उरलेल्या 8 जागांपैकी आसाममध्ये दोन, केरळातील तीन, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा सामावेश आहे. या 13 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 एप्रिल रोजी संपत आहे.

    तर वर्षअखेरीपर्यंत उत्तर प्रदेशातील 11, बिहारच्या पाच, राजस्थानच्या चार, मध्यप्रदेशातील तीन आणि उत्तराखंडच्या एका जागेसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्याशिवाय ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना आणि आंध्रप्रदेशातील जागांवर निवडणुका होणार आहे.

    नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांबाबत काँग्रेसला मोठी आशा होती. या निवडणुकांद्वारे पुन्हा कमबॅक करू असा विश्वास काँग्रेसला होता. मात्र, पाच राज्यांपैकी सत्ता नसलेल्या चार राज्यात काँग्रेसची कामगिरी खराब झालीच शिवाय सत्ता असलेलं पंजाब राज्यही काँग्रेसच्या हातचं निघून गेलं.

    काँग्रेसला पंजाबमध्ये 117 पैकी केवळ 18 जागा मिळाल्या. आपला 92 जागांवर विजय मिळाला. सध्या राज्यसभेत भाजपची सदस्य संख्या 97 आहे. या वर्षअखेरीपर्यंत भाजपची ही संख्या वाढून 104 होण्याची शक्यता आहे. तर एनडीएची सदस्य संख्या वाढून 122 होणार आहे. त्यामुळे भाजप राज्यसभेत बहुमतात येणार आहे.

    Elections in five states will hit Congress in Rajya Sabha too, no longer Leader of Opposition

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!