• Download App
    निवडणूक आयोगाची आज बैठक; उत्तर प्रदेश पंजाब निवडणुका लांबणार?; निवडणूक अलाहाबाद हायकोर्टाचा सूचनेवर निर्णय घेणार? Election Commission meeting today

    निवडणूक आयोगाची आज बैठक; उत्तर प्रदेश पंजाब निवडणुका लांबणार?; निवडणूक अलाहाबाद हायकोर्टाचा सूचनेवर निर्णय घेणार?

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाच राज्यांचा दौरा करून आल्यानंतर निवडणूक आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब सह पाच राज्यांच्या निवडणुकांत संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे. कालच अलाहाबाद उच्च न्यायालयाने विधानसभा निवडणुका पुढे करण्यासंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूचना केली आहे.Election Commission meeting today

    देशात जर कोरोना आणि ओमायक्रोन यांचा धोका वाढत असेल तर गर्दी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचे मेळावे जाहीर सभा घेऊ नयेत. यासाठी विधानसभांच्या नियोजित निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या तरी चालतील, अशा शब्दात अलाहाबाद उच्च न्यायालयाने सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज बैठक होत असून त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.



    सहा दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. परंतु, त्यावेळी तो विषय राजकीय कारणांमुळे गाजला होता. आता मात्र कोरोना आणि ओमायक्रोन साथीच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर थेट अलाहाबाद उच्च न्यायालयात सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेनेच निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना केल्याने त्यावर गांभीर्यपूर्वक विचार करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीत निर्णय होऊन लवकरच निवडणुकीविषयी निर्णयाची माहिती जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

    Election Commission meeting today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार