विशेष प्रतिनिधी
नवी दिल्लीः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचारसभेदरम्यान मुस्लिम मतदारांना केलेल्या आवाहनावरून निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. Election commission issued notice to mamta banerjee
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ममतांना नोटीस बजावली आहे. ममतांना उत्तर देण्यासाठी ४८ तासांच्या आत म्हणजे दोन दिवसांचा अवधी दिला आहे.
तीन एप्रिलला एका प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जींकडून स्पष्टीकरण मागितले आहे. वेगवगेळ्या राजकीय पक्षांमध्ये आपल्या मतांचं विभाजन होऊ देऊ नका, असं आवाहन ममतांनी मुस्लिमांना केलं होतं.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी एक निवडणूक प्रचारसभा घेतली. या सभेत ममतांनी मुस्लिम मतदारांना भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम आणि अब्बास सिद्दीकी यांच्या इंडियन सेक्यलर फ्रंट ऐवजी तृणमूल काँग्रेसला एकजूट होऊन मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर टीका केली. हिंदू-मुस्लिम असे करत ममतांनी मते मागितल्याचा आरोप मोदींनी केला होता.
Election commission issued notice to mamta banerjee
इतर बातम्या वाचा…
- कोरोनावरील लशींच्या बाबतीत भारत जगात भाग्यवान देश, जागतिक बॅंकेचे प्रशस्तीपत्रक
- शेतकऱ्याचा मुलगा, पत्रकार ते भारताचे सरन्यायाधीश, जाणून घ्या न्या. रमणांचा नेत्रदीपक प्रवास
- सुपरस्टार विजय मतदानाला आला चक्क सायकलवरून, फोटोसाठी चाहत्यांकडून पाठलाग
- इस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी
- योगी आदित्यनाथ सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका, १२० पैकी ९४ एनएसएची प्रकरणे ठरवली रद्दबातल