दरम्यान चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदर सिंग आणि त्यांचे सहकारी संदीप कुमार यांच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला. ED raids on homes of Punjab Chief Minister Channy’s relatives
विशेष प्रतिनिधी
पंजाब : ईडीने पंजाबमध्ये 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. अवैध रेती व्यवसाय आणि त्यातून होणारी पैशांची देवाण घेवाण यासंदर्भात ही छापेमारी असल्याचं समजल आहे.मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचे निकवर्तीय ईडीच्या रडारवर असल्याचं कळलं आहे.
दरम्यान चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदर सिंग आणि त्यांचे सहकारी संदीप कुमार यांच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला.दरम्यान या छाप्यात काही मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भारतीय चलन जप्त करण्यात आले.
सूत्रांनी सांगितले की , मोहालीतील अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी भूपिंदरसिंग हनी याच्या परिसरात अंमलबजावणी संचालनालयाने झडती घेतली. तसेच भूपिंदरसिंग हनीच्या निवासास्थानातून 3.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे.या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे 10.7 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.