• Download App
    कुंभमेळ्या दरम्यान बनावट कोरोना चाचण्यांप्रकरणी हरिद्वारमध्ये ईडीचे छापे, मनी लॉँडिंगचा गुन्हा दाखल|ED raids labs for fake corona tests during Kumbh Mela, money laundering case registered

    कुंभमेळ्या दरम्यान बनावट कोरोना चाचण्यांप्रकरणी हरिद्वारमध्ये ईडीचे छापे, मनी लॉँडिंगचा गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजित कुंभमेळ्याच्या काळात झालेल्या बनावट कोरोना चाचण्यांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनेक प्रयोगशाळांवर छापे टाकले. या प्रकरणी मनी लॉँड्रिंगचा गुन्हाही दाखल करण्यात आला आला आहे.ED raids labs for fake corona tests during Kumbh Mela, money laundering case registered

    ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की नोव्हस पथ लॅब्स, डीएनए लॅब्स, मॅक्स कॉपोर्रेट सर्व्हिसेस, डॉ लाल चांदणी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नलवा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयात आणि डेहराडून, हरिद्वार येथील त्यांच्या संचालकांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहे. दिल्ली, नोएडा आणि हिसार येथेही चौकशी करण्यात आली आहे. ईडीने म्हटले आहे की, छाप्यांमध्ये अनेक धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत. बोगस बिले, लॅपटॉप, मोबाईल, मालमत्तेची कागदपत्रे आणि 30.9 लाख रुपये रोख जप्त केले आहेत.



    याबाबत आरोप असलेल्या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात उत्तराखंड पोलिसांनी दाखले केलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास केल्यावर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींखाली ईडीने फौजदारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर छापे टाकण्यात आले.

    या प्रयोगशाळांना उत्तराखंड सरकारने कुंभमेळ्यादरम्यान कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी कंत्राट दिले होते. मात्र, या प्रयोगशाळांनी चाचण्या केल्याच नाहीत. बनावट अहवाल देण्यासाठी बोगस नोंदी केल्या. आपला नफा वाढविण्यासाठी बोगस बिले काढली. या प्रकरणात उत्तराखंड सरकारने त्यांच्याकडून 3.4 कोटी रुपयांची रक्कम यापूर्वीच जप्त केली आहे.

    या प्रयोगशाळांनी एकच मोबाईल नंबर किंवा बनावट मोबाइल नंबर वापरून चाचण्यांचे खोटे अहवाल तयार केले. त्यासाठी पत्ताही एकच वापरला होता. कोरोनाच्या चाचण्या न करताच अहवाल तयार केले. हरिद्वारमधील कुंभमेळ्यात कधीही गेले नव्हते अशांच्याही नावाने चाचण्यांचे अहवाल तयार केल्याचे ईडीने म्हटले आहे. प्रत्यक्षात हरिद्वारचा पॉझिटिव्हीटी रेट ५.८१ टक्के असताना या बनावट चाचणी अहवालांमुळे ०.१८ टक्के दाखविला गेला.

    ED raids labs for fake corona tests during Kumbh Mela, money laundering case registered

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही