• Download App
    काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी धरणीकंप|Earthquake shakes Kashmir for second day in a row

    काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी धरणीकंप

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे ३.०२ वाजता कटरा पूर्वेला ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पळाले. भूकंपामुळे जीवित किंवा मालमत्तेला कोणताही धोका झाल्याचे वृत्त नाही. Earthquake shakes Kashmir for second day in a row

    याआधी बुधवारी (१६ फेब्रुवारी) राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी, त्याचा केंद्रबिंदू पहलगामच्या दक्षिण-नैऋत्येस १५ किमी भागात होता. त्यानंतर त्याची तीव्रता ३.२ मोजली गेली. याआधी १० फेब्रुवारीला पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर त्याची तीव्रता ३.८ इतकी मोजली गेली. याशिवाय ५ फेब्रुवारीला ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. जम्मू विभागातील उधमपूर, डोडा, किश्तवार, पुंछ तसेच काश्मीर खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले.



    काश्मीरमध्ये बुधवारी पहाटेही भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे ५.४३ वाजता पहलगामपासून १५ किमी दक्षिण-नैऋत्य भागात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली.

    नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, देशात एका वर्षात ९६५ किरकोळ आणि मोठे भूकंप झाले. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत देशात एकूण ९६६ लहान-मोठे भूकंपांची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे हे सर्व भूकंप कमी तीव्रतेचे होते, त्यामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही.

    Earthquake shakes Kashmir for second day in a row

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार