विशेष प्रतिनिधी
जम्मू : काश्मीरमध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे 5.43 वाजता पहलगामपासून 15 किमी दक्षिण-नैऋत्य भागात 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. भूकंपामुळे जीवित किंवा मालमत्तेला कोणताही धोका झाल्याचे वृत्त नाही. Early morning earthquake in Kashmir
यापूर्वी राज्यातील पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये 10 फेब्रुवारीला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 3.8 मोजली गेली. याशिवाय 5 फेब्रुवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी तीव्रता 5.7 मोजली गेली होती. उधमपूर, डोडा, जम्मू विभागात तसेच किश्तवाड, पुंछ तसेच काश्मीर खोऱ्यातही धक्के जाणवले गेले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, देशात एका वर्षात 965 किरकोळ आणि मोठे भूकंप झाले. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत देशात एकूण 965 लहान-मोठे भूकंपांची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे हे सर्व भूकंप कमी तीव्रतेचे होते, त्यामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही.
Early morning earthquake in Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब विधानसभेच्या तोंडावर कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सोडला पक्ष, नेतृत्व प्रेरणादायी नसल्याचा केला आरोप
- भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तानात आश्रय, भारताने संयुक्त राष्ट्रसंघात वाचला पाकिस्तानच्या कृत्यांचा पाढा
- मदतीचे हात पुढे करूनही तालीबान्यांचे शेपुट वाकडेच, भारताला चिथावण्यासाठी सैन्याच्या तुकडीचे नाव ठेवले पानिपत
- काश्मीरच्या मुद्यावरून भारत- पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युध्दाची शक्यता, इम्रान खान यांच्या वक्तव्याने तणाव