• Download App
    इम्रान खान यांच्याविरुध्द आंदोलन करताना बेनझीर यांची कन्या आसिफा भुट्टो यांच्या चेहऱ्यावर आदळले ड्रोन|Drone hits Benazir Bhutto's daughter Asifa Bhutto in the face while protesting against Imran Khan

    इम्रान खान यांच्याविरुध्द आंदोलन करताना बेनझीर यांची कन्या आसिफा भुट्टो यांच्या चेहऱ्यावर आदळले ड्रोन

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांची कन्या आसिफा भुट्टो झरदारी या पाकिस्तानातील पंजाबमध्ये इमरान खान सरकारविरुद्ध आंदोलन करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावर ड्रोन विमान आदळले. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.Drone hits Benazir Bhutto’s daughter Asifa Bhutto in the face while protesting against Imran Khan

    पंजाब प्रांतातील खानेवाल येथे एका रॅलीत ही घटना घडली. बेनझीर यांचे पुत्र बिलावल भुट्टो हेही याप्रसंगी उपस्थित होते. आसिफा टाळ्या वाजवत असताना ड्रोन त्यांच्या चेहऱ्यावर आदळले. त्यामुळे त्या खाली कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या डोक्याला ५ टाके पडले आहेत. याप्रकरणी ड्रोन ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे.



    आसिफा या इंग्लंडमध्ये शिकून आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या पाकिस्तानातील राजकारणात सक्रीय असून इम्रान खान यांच्यावर टीका करत आहेत. इम्रान खान यांना रोखण्यासाठी भुट्टो कुटुंबिय आणि नवाझ शरीफ यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    आसिफा यांच्या आई आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची रावळपिंडीत एका सभेतच आत्मघातकी बॉँबहल्यात हत्या झाली होती.

    Drone hits Benazir Bhutto’s daughter Asifa Bhutto in the face while protesting against Imran Khan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे