• Download App
    इंधन दरवाढीचा डबल डोस; दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेल ८५ पैशांनी महागले । Double dose of fuel price increase; Even the next day Petrol-diesel prices go up by 85 paise

    इंधन दरवाढीचा डबल डोस; दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेल ८५ पैशांनी महागले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : इंधन दरवाढीचा डबल डोस आज ग्राहकांना दिला आहे। सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेल ८५ पैशांनी महागले आहे. Double dose of fuel price increase; Even the next day Petrol-diesel prices go up by 85 paise

    पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच आता नियमितपणे इंधन दरवाढ सुरू झाली आहे. तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. कालच देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ केली आहे.



    आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८५ पैशांनी वाढ झाली असून येथे पेट्रोलचा दर ११२.६७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९५.८५ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. देशातील सर्व महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती सर्वाधिक आहेत. दरम्यान, कालच घरगुतीत गॅस सिलिंडरच्या दरातही ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

    Double dose of fuel price increase; Even the next day Petrol-diesel prices go up by 85 paise

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Terrorist attack : काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Bansuri Swaraj : बांसुरी स्वराज यांनी गांधी कुटुंबाला एका खास ‘बॅग’द्वारे केले लक्ष्य

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!