• Download App
    भाऊरायांची भाजपमध्ये जाण्याची चर्चा, ममता बॅनर्जींनी वहिनीसाहेबांना आणले राजकारणात|Discussion of brothers joining BJP, Mamata Banerjee brought sister in law into politics

    भाऊरायांची भाजपमध्ये जाण्याची चर्चा, ममता बॅनर्जींनी वहिनीसाहेबांना आणले राजकारणात

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : भाऊरायाची भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची चर्चा सुरू झाल्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या वहिनीसाहेबांना राजकारणात आणले आहे. यावरून तृणमूल कॉंग्रेसमध्येही घराणेशाही सुरू झाल्याची टीका होत आहे.Discussion of brothers joining BJP, Mamata Banerjee brought sister in law into politics

    ममता यांच्या ‘भाऊ साहेबां’शी संपर्क साधावा, भाजपमध्ये येण्यासाठी काही अट असेल तर त्यावरही विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिल्लीतून भाजपने राज्यातील नेत्यांना दिले आहेत. भाजपचा हा डाव ममतांच्या लक्षात येताच त्या सावध झाल्या.



    भावाची नाराजी दूर करण्यासाठी लगेचच कोलकाता महापालिकेच्या निवडणुकीत वहिनीला तिकीट देऊन त्यांची राजकारणात एन्ट्री करून दिली गेली.वहिनीचा नवरा म्हणजेच ममतांचा मोठा भाऊ ममतांवर खूप दिवसांपासून रागावला होता. त्यांनाही राजकारणात स्थान हवे आहे,

    पण ममतांनी त्यांच्यापासून अंतर राखले आहे. ममता यांनी आपल्या दुसऱ्या भावाचा मुलगा अभिषेकला ज्या पद्धतीने राजकारणात पुढे नेले, ती बाब दुसऱ्या भावाला आवडलेली नाही. अनेकवेळा त्यांनी जाहीरपणे आपली नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा येत होत्या.

    Discussion of brothers joining BJP, Mamata Banerjee brought sister in law into politics

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे