कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्या असल्याने अनेक ठिकाणी लसीकरणावर परिणाम झाला आहे . मात्र, आता लसींच्या पुरवठ्यासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.दिल्लीसह १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना थेट कोरोना लसी पाठविण्यास भारत बायोटेकने सुरू केले आहे. १ मेपासून राज्यांना लस पुरवठा सुरू देखील केला आहे.Direct vaccine supply to states from Bharat Biotech, starting in 14 states
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्या असल्याने अनेक ठिकाणी लसीकरणावर परिणाम झाला आहे . मात्र, आता लसींच्या पुरवठ्यासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.
दिल्लीसह १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना थेट कोरोना लसी पाठविण्यास भारत बायोटेकने सुरू केले आहे. १ मेपासून राज्यांना लस पुरवठा सुरू देखील केला आहे.
कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी सांगितले की, भारत बायोटेकने १ मेपासून दिल्ली आणि महाराष्ट्रासह १४ राज्यांना कोरोनाच्या या लसीचा थेट पुरवठा सुरू केला आहे.
हैदराबादस्थित कंपनीने केंद्र सरकारला मिळालेल्या लोकेशनच्या आधारे ही लस पुरवण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे लसींचा साठा पाठविला आहे.
दरम्याम, २९ एप्रिल रोजी भारत बायोटेकने राज्यांसाठी लसीच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली, जी आधी प्रति डोस ६०० रुपये होती, नंतर ती कमी करुन ४०० रुपये प्रति डोस करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसींचा १ कोटींपेक्षा जास्त लसींचा डोस आहे आणि येत्या तीन दिवसांत त्यांना अतिरिक्त नऊ लाख डोस देण्यात येतील.
केंद्राने आतापर्यंत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कोरोना विरूद्ध लढण्यासाठी कोरोना लसीचे डोस १७ कोटी ९३ लाख ५७ हजार ८६० डोस विनामूल्य दिले आहेत.
Direct vaccine supply to states from Bharat Biotech, starting in 14 states