• Download App
    पश्चिम बंगाल पोलीसांवर विश्वास राहिला नाही, भाजपाच्या सगळ्या आमदारांना केंद्र पुरविणार सुरक्षा|Direct vaccine supply to states from Bharat Biotech, starting in 14 states

    भारत बायोटेककडून राज्यांना थेट लस पुरवठा, १४ राज्यांमध्ये सुरूवातही

    कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्या असल्याने अनेक ठिकाणी लसीकरणावर परिणाम झाला आहे . मात्र, आता लसींच्या पुरवठ्यासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.दिल्लीसह १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना थेट कोरोना लसी पाठविण्यास भारत बायोटेकने सुरू केले आहे. १ मेपासून राज्यांना लस पुरवठा सुरू देखील केला आहे.Direct vaccine supply to states from Bharat Biotech, starting in 14 states


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्या असल्याने अनेक ठिकाणी लसीकरणावर परिणाम झाला आहे . मात्र, आता लसींच्या पुरवठ्यासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.

    दिल्लीसह १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना थेट कोरोना लसी पाठविण्यास भारत बायोटेकने सुरू केले आहे. १ मेपासून राज्यांना लस पुरवठा सुरू देखील केला आहे.



    कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी सांगितले की, भारत बायोटेकने १ मेपासून दिल्ली आणि महाराष्ट्रासह १४ राज्यांना कोरोनाच्या  या लसीचा थेट पुरवठा सुरू केला आहे.

    हैदराबादस्थित कंपनीने केंद्र सरकारला मिळालेल्या लोकेशनच्या आधारे ही लस पुरवण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे लसींचा साठा पाठविला आहे.

    दरम्याम, २९ एप्रिल रोजी भारत बायोटेकने राज्यांसाठी लसीच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली, जी आधी प्रति डोस ६०० रुपये होती, नंतर ती कमी करुन ४०० रुपये प्रति डोस करण्यात आली आहे.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसींचा १ कोटींपेक्षा जास्त लसींचा डोस आहे आणि येत्या तीन दिवसांत त्यांना अतिरिक्त नऊ लाख डोस देण्यात येतील.

    केंद्राने आतापर्यंत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कोरोना विरूद्ध लढण्यासाठी कोरोना लसीचे डोस १७ कोटी ९३ लाख ५७ हजार ८६० डोस विनामूल्य दिले आहेत.

    Direct vaccine supply to states from Bharat Biotech, starting in 14 states

     

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप