वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंट व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. अगदी चहा, किराणा मालाच्या दुकानापासून मोठ्या स्टोअर्समध्ये डिजिटल पेमेंट सूचनांचे फलक झळकत आहेत. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच पाच वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांची वाढ झाली आहे. Digital payments soar in the country, From small Shops to large stores
गुगल पे, पेटीएम, फोन पे आणि भीमसारख्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला १२२ कोटीची देवाणघेवाण होत आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला तर या डिजिटल व्यवहारात ५५०टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१६-१७मध्ये १००४ करोड डिजिटल व्यवहार झाले होते. हा आकडा २०२० – २१ मध्ये ५५५४ कोटीपर्यंत पोचला आहे. २१ च्या एप्रिल-मे महिन्यात डिजिटल व्यवहाराचा आकडा २०२० च्या तुलनेत १०० टक्के जास्त वाढला आहे. क्यूआर कोडने यूपीआय पेमेंटची सुविधा आहे. याशिवाय आता ग्राहकांना अनेक सुविधा देण्यावर काम सुरू आहे. पाच वर्षांमध्ये या तंत्रात आणखी बदल होणार आहे.
पेटीएम अव्वल
मोबाईल पेमेंटच्या दुनियेत सध्यातरी पेटीएम अव्वल आहे. अनेकांचा पेटीएम वापरण्याकडे कल आहे. पेटीएमकडे सुमारे एक कोटी 60 लाख व्यावसायिक आस्थापनांनी पेमेंट भागीदारी केली आहे.
भविष्यात तंत्रज्ञानात होतील बदल
- बायोमेट्रीक तंत्र – ज्याप्रमाणे आपण स्मार्टफोन अंगठा दाखवून अनलॉक करतो त्याचप्रमाणे फिंगर प्रिंट टेक्नॉलॉजीचा वापर पेमेंट जगतात करण्याचा प्रयत्न आहे. ब्रिटनमधील काही बँका प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रीक कार्ड जारी करत आहेत.
- आवाज हीच ओळख – अमेझॉन आणि गुगल पेसारख्या पंपन्या व्हॉईस पेमेंटचा प्रयोग करत आहेत. सध्या अमेरिकेत यावर काम सुरू आहे.
- टॅप अँड गो पेमेंट – फक्त आपल्या पेमेंट कार्डाला मशीनमध्ये टॅप करायचे आणि जायचं. इतपं सोपं तंत्र जगभरात वेगाने पसरत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्हिसा, मास्टर कार्ड आणि एनपीसीआयला ‘टॅप अँड गो पेमेंट’ला मंजुरी दिली आहे.
- चेहऱ्याची जादू – चेहऱ्याचा वापर करणारे फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर चीनसारख्या देशात सुरू झाला आहे.
Digital payments soar in the country, From small Shops to large stores
महत्त्वाच्या बातम्या
- JK Leaders Meet : जम्मू-काश्मीरवर साडेतीन तास मंथन, पंतप्रधान मोदींचा फ्यूचर प्लॅन, असे आहे टॉप 10 मुद्दे
- GOOD NEWS : महाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक ; 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी ; वाचा सविस्तर
- Fact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं ? काय आहे सत्य;चकीत करणारे खुलासे
- India Corona Vaccination : देशात दिवसात ६० लाख जणांचे लसीकरण, महाराष्ट्र, गुजरात आघाडीवर; आतापर्यंत २.७४ कोटी नागरिकांना डोस
- बहिणीच्या तक्रारीवरून प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलीसांनी घेतले ताब्यात