• Download App
    केंद्राकडून व्हेंटिलेटर्सचे वाटप होऊनही राज्यांनी रुग्णालयांना पुरविलेच नाहीत|Despite the distribution of ventilators by the Center, the states have not provided hospitals

    केंद्राकडून व्हेंटिलेटर्सचे वाटप होऊनही राज्यांनी रुग्णालयांना पुरविलेच नाहीत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर्सचे वाटप होऊनही अनेक राज्यांनी रुग्णालयांना पुरविलेच नाहीत. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांचा सतत पाठपुरावा केल्याचेही म्हटले आहे.Despite the distribution of ventilators by the Center, the states have not provided hospitals

    रुग्णलयांकडून मागणी होत नसल्याने काही राज्यांनी व्हेंटिलेटर्सचं वाटप केलं नाही. त्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी काही राज्यांना व्हेंटिलेटर्स रुग्णालयांना देण्याची सूचना केली. अतिरिक्त मागणी असल्यास मागणी करावी असेही सांगितलं. त्यानंतर अनेकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आठवण करून दिली, असेही केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.



    करोनाच्या दुसºया लाटेत आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राणाला मुकावं लागल्याचीही घटना समोर आल्या होत्या. व्हेंटिलेटर्सचीही मोठ्या प्रमाणात मागणी होती. केंद्र सरकारने १३ हजार व्हेंटिलेटर्स धूळ खात पडली होती.

    मात्र त्याचं वितरण केलंच नाही असं सांगण्यात आले होते. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं आहे. केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स वितरीत केले नाहीत, हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. तसेच केंद्र सरकारकडून पुरवलेले व्हेंटिलेटर्स काही राज्यांनी वापरले नसल्याचा आरोपही केला आहे.

    प्रत्येक व्हेटिंलेटर्स राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्यवेळी वितरीत केले आहे. त्यामुळे माध्यमात आलेल्या बातम्या निराधार आहेत, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून व्हेंटिलेटर्सची ऑ डर देण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १७ मार्च २०२० ते २७ मार्च २०२१ पर्यंत ५८ हजार ८५० व्हेंटिलेटर्स ऑर्डर केले होते.

    Despite the distribution of ventilators by the Center, the states have not provided hospitals

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट