• Download App
    प्रकाशसिंह बादल यांना देवेंद्र फडणवीसांनी संबोधलं होतं ‘’भारताच्या राजकारणातले पांडवांच्या बाजूचे भीष्म पितामह’’ Deputy Chief Minister Fadnavis condoled the death of Prakash Singh Badal

    प्रकाशसिंह बादल यांना देवेंद्र फडणवीसांनी संबोधलं होतं ‘’भारताच्या राजकारणातले पांडवांच्या बाजूचे भीष्म पितामह’’

    जाणून घ्या, प्रकाशसिंह बादल यांनी काय दिला होता कानमंत्र?

    विशेष प्रतिनिधी

     मुंबई : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बादल हे देशाच्या राजकारणातील सर्वात जुने नेते होते. राजकीयदृष्ट्या त्यांचा दबदबा असा होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांना चरणस्पर्श करत असत. त्यांनी 75 वर्षे यशस्वी राजकीय जीवन जगले. त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोकभावना व्यक्त होत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोकभावना व्यक्त करत, प्रकाशसिंह बादल यांच्या आठवणींना उजाळा दिला. Deputy Chief Minister Fadnavis condoled the death of Prakash Singh Badal

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’सन २०१५मध्ये पुणे येथे प्रकाशसिंह बादल यांना ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार‘ प्रदान करण्याची संधी मला मिळाली होती. त्यावर्षी मी देशाचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होतो. तर प्रकाशसिंह बादल हे देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री! ‘’भारताच्या राजकारणातले पांडवांच्या बाजूने असणारे भीष्म पितामह,” या शब्दात मी प्रकाशसिंह बादल यांचा उल्लेख केला तेव्हा त्यांनी स्मितहास्य करून दाद दिली होती.’’

    Prakash Singh Badal Profile : 76 वर्षांची राजकीय कारकीर्द, देशातील सर्वात वयोवृद्ध नेत्यापुढे मोदीही व्हायचे नतमस्तक, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परत केला होता पद्मविभूषण

    याचबरोबर ‘’भारतीय राजकारणातील भीष्म पितामह असलेल्या बादल यांना पंजाबच्या जनतेने सन १९५७ पासून दहावेळा विधानसभेत निवडून दिले. पाचवेळा त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. माझ्यासारख्या तरुण मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान स्वीकारल्यानंतरच्या जाहीर मनोगतामध्ये त्यांनी मोठा कानमंत्रच दिला होता. ते म्हणाले होते, “राजनीति में अकेले जवानी से काम नहीं चलता; जज्बा चाहिए, तजुर्बा भी चाहिए!” अशी आठवणीही फडणवीस यांनी यावेळी सांगितली.

    ‘जज्बा’ आणि ‘तजुर्बा’ राखून असलेला नेता आज स्वर्गवासी झाल्याने भारतीय लोकशाहीचे अपरिमित नुकसान झाले आहे. प्रकाशसिंह बादल यांना माझी विनम्र श्रद्धांजली. अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

    Deputy Chief Minister Fadnavis condoled the death of Prakash Singh Badal

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!