प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ (DU) राहुल गांधींना न कळवता कॅम्पसला भेट दिल्याबद्दल नोटीस बजावणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. मंगळवारी किंवा बुधवारी नोटीस पाठवली जाईल, असे कुलसचिव विकास गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले की, विद्यापीठ नेत्याला कळवेल की अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येते आणि अशा कोणत्याही संवादासाठी योग्य प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे.Delhi University will send a notice to Rahul Gandhi! A warning may be obtained not to visit the campus without permission
राहुल गांधी यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन हॉस्टेलला भेट दिली होती. येथे त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत भोजनही केले. ही अनधिकृत भेट असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी आत गेले तेव्हा विद्यार्थी जेवण करत होते. आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये हे सहन करू शकत नाही. कॅम्पसच्या वतीने राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुन्हा असे कृत्य करू नये, असे नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगण्यात येणार आहे.
एनएसयूआयचा आरोप
दरम्यान, काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) राहुल गांधींविरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी कुलसचिवांनी आरोप फेटाळून लावत ‘असा कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. ही शिस्तीची बाब असल्याचे ते म्हणाले. अशा घुसखोरीच्या घटना टाळण्यासाठी विद्यापीठाचे अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत.
राहुल गांधी शुक्रवारी अचानक कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. दुपारी 2 नंतर ते कॅम्पसमध्ये पोहोचले आणि तेथे सुमारे एक तास घालवला. तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यांच्या करिअरच्या योजनांची माहिती घेतली.
Delhi University will send a notice to Rahul Gandhi! A warning may be obtained not to visit the campus without permission
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याच महिन्यात पीएम मोदींना भेटण्याची शक्यता, पॅसिफिक आयलँड लीडर्स मीटमध्ये ठरवणार भविष्यातील रणनीती
- द फोकस एक्सप्लेनर : इम्रान खान यांना का झाली अटक? जाणून घ्या काय आहे अल-कादिर ट्रस्ट केस? अटकेमुळे पेटून उठला अवघा पाकिस्तान
- DRDO शास्त्रज्ञाच्या पोलीस कोठडीत वाढ, हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप
- WATCH : पीक कर्जासाठी सिबिल स्कोर मागणाऱ्या बँकेविरुद्ध FIR दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश