Central Vista Project : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने या खटल्याचा निर्णय राखून ठेवला आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली उच्च न्यायालयाला सर्व बांधकामांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान डीडीएमएचे आदेश आणि दिल्लीच्या हेल्थ बुलेटिनबाबत सांगण्यात आले. स्थगितीच्या मागणीचा सॉलिसिटर जनरल यांनी विरोध केला. Delhi High Court Reserves Judgment On Plea To Suspend Central Vista Project Work Amid COVID
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने या खटल्याचा निर्णय राखून ठेवला आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली उच्च न्यायालयाला सर्व बांधकामांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान डीडीएमएचे आदेश आणि दिल्लीच्या हेल्थ बुलेटिनबाबत सांगण्यात आले. स्थगितीच्या मागणीचा सॉलिसिटर जनरल यांनी विरोध केला.
सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, ही जनहित याचिका ‘प्रेरित’ आहे. शापूरजी पालनजी ग्रुपचे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह यांनीही याचिका दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले. दोन्ही वकिलांनी म्हटले की, खटला खळबळजनक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 180 बसगाड्यांना परवानगी नव्हती. 400 बांधकाम कामगारांसाठी 180 बसेसची आवश्यकता नाही.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, ट्रक व इतर वाहनांसह 4 बसेस आणि इतर वाहनांसाठी परवानगी मागण्यात आली होती. त्यांनी कोर्टाला म्हटले की, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम कोरोना मार्गदर्शक तत्त्वांतर्गत केले जात आहे. ज्यांना कोणत्याही कारणास्तव हा प्रकल्प पसंत नाही, असे लोक विविध रूपांत न्यायालयांमध्ये येत आहेत.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, याचिकाकर्त्याचे जनहित अतिशय सिलेक्टिव्ह आहे, त्यांना दुसऱ्या प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजुरांची कोणतीही परवा नाही. जी केवळ 2 किमी अंतरावर सुरू आहेत. ते म्हणाले की, डीएमआरसीचे प्रोजेक्ट आहेत, डीडीएचे हाऊसिंग प्रोजेक्ट आहेत, प्रगति मैदान प्रोजेक्ट आहे, परंतु याच्याशी कुणालाही काहीही देणेघेणे नाही.
Delhi High Court Reserves Judgment On Plea To Suspend Central Vista Project Work Amid COVID
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीमध्ये जैशच्या दहशतवाद्याला अटक, साधूच्या वेशात स्वामी नरसिंहानंदांच्या हत्येचा होता कट
- Photos Cyclone Tauktae : चक्रीवादळ तौकतेने केला असा विध्वंस, या फोटोंमधून पाहा विविध शहरांचे हाल
- बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचार्याशी होते अवैध संबंध, कंपनीनेही चालवली होती चौकशी
- मोठी बातमी : चक्रीवादळ तौकतेच्या मार्गात ओएनजीसीची बोट अडकली, 273 जणांच्या बचावासाठी भारतीय नौसेनेची दोन जहाजे रवाना
- मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये