• Download App
    भारतातील दिल्ली, मुंबई ही शहरे सुरक्षित; जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश|Delhi and Mumbai are safe city; Included in the list of safest cities of the world

    भारतातील दिल्ली, मुंबई ही शहरे सुरक्षित; जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर झाली आहे. त्यात भारतातील नवी दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन पहिल्या क्रमांकावर आहे.
    Delhi and Mumbai are safe city; Included in the list of safest cities of the world

    द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जगभरातल्या ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण केले. सुरक्षित शहरे निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता.



    भारताची राजधानी दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५० व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध आहे. मुंबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असून वैयक्तिक सुरक्षेत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे. तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५० व्या क्रमांकावर आहे.

    डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन १०० पैकी ८२.४ पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. कोपेनहेगनने टोकियो आणि सिंगापूरसारख्या शहरांना मागे टाकत सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर कॅनडाची राजधानी टोरंटो आहे. टोरंटोला ८२.२ पॉइंट्स मिळाले आहेत. टोरंटोत जवळपास ३० लाख लोक १८० भाषा बोलतात.

    तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर शहर आहे. ते दुसऱ्या क्रमांवरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहे. कोरोनाचा सिंगापूरला मोठा फटका बसला असला तरी हे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिल आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी आहे. सिडनीला ८०.१ पॉइंट्स मिळाले आहेत. सिडनी हे खाद्यप्रेमींसाठी पर्वणी आहे. तर पाचव्या क्रमांकावर जपानची राजधानी टोकियो आहे.

    Delhi and Mumbai are safe city; Included in the list of safest cities of the world

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार