वृत्तसंस्था
बेंगळुरू : दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आदींच्या नावाने सरकारी योजना आहेत. त्या योजनांची नावे बदलण्याची मागणी आम्ही करायची काय?, असा सवाल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी केला आहे.Deendayal, should the names of government schemes named after Atalji be changed when the Congress government comes ?; Siddaramaiah’s sharp question to Modi government
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. जनसंघ नेते दीनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे काँग्रेसने आपले सरकार आल्यावर बदलायची काय? एवढेच नाही तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने स्टेडियम आहे त्या स्टेडियमचे नाव देखील नंतर बदलायचे काय?, असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. परंतु सिद्धरामय्या यांनी भाजप आणि जनसंघाच्या जुन्या नेत्यांची नावे घेऊन त्यांच्या नावाच्या सरकारी योजनांचा उल्लेख केला आहे.
त्याच बरोबर काँग्रेसची सत्ता आली तर त्यांच्या नावांच्या योजनांची ना नावे बदलण्याचे ही सूतोवाच केले आहे.बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीका करताना जनसंघ आणि भाजपच्या नेत्यांची नावे घेऊन त्यांच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे बदलण्याचे सूतोवाच केलेले नाही.
Deendayal, should the names of government schemes named after Atalji be changed when the Congress government comes ?; Siddaramaiah’s sharp question to Modi government
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर अटकेची टांगती तलवार, कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, लखनऊ पोलीस मुंबईत दाखल
- खासदार अभिषेक बॅनर्जींना ममतांनी बुलेटप्रूफ गाडी दिली; तृणमूळ – भाजपचा आता त्रिपूरात संघर्ष; ममता बॅनर्जींचा अमित शहांवर हल्लाबोल
- मध्य प्रदेश विधानसभेतून पप्पू, मिस्टर बंटाधार, ढोंगी, चोर ससूर शब्द हटविले
- अमेझॉनच्या जेफ बेझोस यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले बर्नार्ड अरनॉल्ट, जाणून घ्या या फ्रेंच उद्योगपतीबद्दल
- पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा आठवडा : 127 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृह तहकूब